अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे !…. – मा.योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन!

🔹केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना!….

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.25नोव्हेंबर):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 15% अनुदानावर मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता शासन निर्णय क्रमांक – जमीन – मसाका 2018 /प्र.क्र.259 (2) /अजाक, दि.8 मार्च, 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना राबविण्यात येत आहे.

सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25% मधील जास्तीत जास्त 15% मार्जीन मनी उपलब्ध करुन मान्यता देण्यात येते. सदरील पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी 10% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15% मार्जीन मनी शासनामार्फत देण्यात येते.

अर्जासोबत अर्जदाराचा फोटोग्राफ, जातीचा दाखला, उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र, उद्योगासाठी निवडलेल्या जागेचा 7/12 उतारा व पूर्ण पत्ता, रहिवासाचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याची संपूर्ण माहिती व हमीपत्र (शपथपत्र / नोटरीव्दारे). या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

संविधान दिवस म्हणजे लोकशाहीचा उत्सव

अधिक माहितीसाठी संपर्क – सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

आबादी की चिंता की आड़ में सांप्रदायिक राजनीति!

चला भारतीय संविधान समजून घेवूया!

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED