दहाचाकी मालवाहतुक ट्रक तरुणीच्या अंगावरून गेल्याने जागीच ठार

🔸घटनास्थळावरून प्रसार होणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून पोलीसानी पकडले

🔹ट्रक चालक व क्लीनर वसंत नगर पोलिसांच्या ताब्यात

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

🔹उमरखेड येथे भाऊबंधुच्या लग्नाला जात होत्या माय-लेकी

पुसद(दि.26नोव्हेंबर):-शहरापासून जवळच असलेल्या पार्डी येथे राहणाऱ्या माय-लेकी त्या उमरखेड येथे नातलग भाऊबंधुच्या लग्नाकरिता दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दुचाकीने बस स्थानकाकडे जात होत्या. दरम्यानच्या वेळेला दहा चाकी मालवाहू ट्रकचा दुचाकीला कट लागल्याने आई-वडील बाजूला पडले तर तरुणी ट्रकच्या मागील चाकाखाली आली. तिच्या अंगावरून ट्रक गेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून मालवाहू ट्रक कारला रोडकडे धुमस्टाईलने पसार होत असताना पाठलाग करत पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.ग्रामीण पोलिसांनी दहा चाकी मालवाहू ट्रक जप्त केला आहे.तर ड्रायव्हर व क्लीनरला वसंत नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ड्रायव्हर विरोधात वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वैष्णवी संजय गोरे वय २० वर्षे रा.पार्डी असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे राहणारा ट्रक ड्रायव्हर अनिल रावसाहेब धनवटे वय ३६ वर्षे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ड्रायव्हर सोबत क्लिनर आमीन मुरा सय्यद वय ४२ वर्ष हा देखील वसंत नगर पोलिसांच्या ताब्यात आहे.ट्रक चालका विरोधात वैष्णवीचा भाऊ श्याम दिलीप गोरे रा.पार्डी याने वसंत नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. तर संजय दत्तात्रय गोरे वय ५३ वर्षे व मंदा संजय गोरे वय ४८ वर्षे यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.वसंत नगर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार संजय गोरे हे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रीतून त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.

संजयची पत्नी मंदा व मुलगी वैष्णवी यांना उमरखेड येथे भाऊबंधुकीचे लग्न असल्याने त्यांना पुसद आगारात सोडण्याकरिता दुचाकी क्र. एमएच २९,बीएल ८०९२ ने सकाळी ७ दुचाकीला भाजीपाला बांधून पार्डी येथुन निघाले व मधातच लागणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते छत्रपती शिवाजी चौकालगत असलेल्या महाजन पेट्रोल पंप जवळील बस स्थानक निवारा समोर ७.३० वाजताच्या दरम्यान आले.अशावेळी मागून येणाऱ्या दहा चाकी मालवाहू ट्रक क्र.एमएच १८,बीजी ६७०२ चा चालक अनिलने भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालुन दुचाकीला कट मारला.कट लागल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मागे बसून असलेली वैष्णवी ट्रकच्या मागील चाकाखाली आली.

त्यानंतर ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिच्या मेंदूचा चेंदामेंदा झाला होता.तर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने संजय व मंदा हे दोघेही बाजूला फेकल्या गेल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.अपघात स्थळावरून ट्रक चालक धुमठोकत ट्रक घेऊन कारला मार्गे प्रसार होत असताना पाठलाग करून त्याला पकडण्यात यश मिळविले.अपघात झाल्याची माहिती कळतच नागरिकांनी गर्दी उसळली असता यवतमाळ व वाशिम रोडवरील वाहतूक खोळंबली होती.

Breaking News, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED