वाघाच्या हल्लात महीला ठारः पाहार्णी येथील घटना

✒️नागभीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 नागभीड(दि.26नोव्हेंबर):- नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील महीला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली आहे. मृतक महीलेचे नाव वनिता वासुदेव कुंभरे वय ५७ वर्षे आहे. मृतक महीला ही शेतावर गवत कापन्यासाठी दुपारच्या वेळेत गेली होती. गवत कापत असतांना या महीलेवर वाघाने हल्ला करुन ठार केले.

घरी परत नआल्याने शेताकडे शोधाशोध करण्यात आली. तेव्हा ही घटना लक्षात आली. मृतक वनिता कुंभरे यांना पती, दोन मुले आणी एक मुलगी आहे. वन विभाग नागभीड येथील कर्मचारी पाहार्णी येथे दाखल झाले असुन पुढील तपास करीत आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED