विदर्भ मातंग समाज युवक संघटना पुनर्जीवीत झाली…

34

🔹दशकापासून अनेक वंचिताला न्याय मिळवून देण्यासाठी सरसावणारी विदर्भ मातंग समाज युवक संघटना

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4डिसेंबर):-पुनर्जीवित झाली आज दिनांक 4/12/2022 रोजी विदर्भ मातंग समाज युवक संघटनाची कार्यकार्याची बैठक शुभम कॉलनी, लोहारा येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष म्हणून प्रा.संजय वानखडे संस्थापकीय अध्यक्ष विदर्भ मातंग संघटना हे होते…

त्यांनी 2010 पासून तर 2022 पर्यंतचा संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला सोबतच व्हिजन -2025 मिशन हे नवे मिशन समाजासाठी आणले यात समाजाचा शेवटच्या घटकापर्यंतचा शैक्षणिक,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक विकास आखण्यात आला सोबतच नवयुवकांसाठी अभिप्रेत असे उद्योग समूह निर्माण करुन त्यांना स्वयम प्रगत करून सामाजिक विकास कसा साधता येईल आणि स्पर्धा परीक्षेचे युगात समाजातील तरुणांना नव नवीन नोकऱ्याची दालन कसे निर्माण करता येईल यावर व्हिजन-2025 मिशन आखलेला आहे… बँड उद्योगातील कलावंतांना लोककलावंत म्हणून दर्जा प्राप्त करून शासन स्तरावर कशी मदत करता येईल यावर पण व्हिजन-2025 मिशन… भूमीहिन शेतमजूर आणि समाजातील अल्प भूधारक शेतकरी, रंगरंगोटी करणारे पेंटर, इमारत बांधकाम कामगार यांना हक्काचे घर व त्याच्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे प्राप्त करुन द्यायचे हे व्हिजन-2025 चे मिशन आहे. देशाला स्वतंत्र 75 वर्षे पूर्ण झाली तरी समाजाला न्याय मिळाले नाही… आरक्षणाच्या बाबतीत अ ब क ड वर्गवारी आज पण जशीच्या तशीच आहे. त्यावर कोणताही नेता किंवा कोणताही नेता बोलत नाही.महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट २००३ रोजी मातंग समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक पाहणीसाठी ‘क्रांतिवीर लहुजी साळवे’ आयोग नेमला.

कोणताही आयोग नेमत असताना त्याच्या आयोगाचे काम गंभीरपणे, तटस्थपणे न्यायाच्या भूमिकेतून व्हावे यासाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते. परंतु या आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय जे शारीरिकदृष्ट्या थकलेले आहेत, बौध्दिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांची निवड करुन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. यावरुन शासनाचा मातंग समाजाबद्दल असणारा दृष्टिकोन व उदासीनताच दिसून आली. जगद्विख्यात साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा बहुमान मिळावा यासाठी आता व्हिजन-2025 मिशन पुन्हा एकदा मैदानात उतरली आहे. समाजाच्या हक्कासाठी सडो की पडो ही भूमिका धारण करून विदर्भ मातंग समाज युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संजय वानखडे आणि त्यांची टीम तयार झालेली आहे…

आज या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची प्रा.संजय वानखडे यांच्या हस्ते नियुक्ती देण्यात आली. विदर्भ सचिवाच्या पदी समाजातील युवा तडफदार नेतृत्व दीपक यंगड यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी संजय आमटे, संघटनेच्या संघटक पदी रंजीत झोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली.. त्या सोबतच यवतमाळ जिल्हा कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष म्हणून संतोष कांबळे, कार्याध्यक्ष म्हणून श्याम खडसे तर उपाध्यक्ष रामाभाऊ लोंढे व जिल्हासचिव म्हणून सुनील हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली…

व्हिजन -2025 मिशन अंतर्गत लवकरच दारव्हा,नेर, दिग्रस,आर्णी, पुसद, उमरखेड महागाव या तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा निर्माण करुन शेवटच्या घटका पर्यंत समाजाच्या विकासाचा संकल्प नेण्याचे ठरविले आहे… अशी माहिती विदर्भ मातंग समाज युवक संघटना विदर्भ सचिव तथा प्रभारी प्रसिद्धी प्रमुख दीपक यंगड यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिली आहे.

https://www.purogamiekta.in/2022/12/03/56394/