राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे महापरिनिर्वाणदिनी परमपूज्य, महामानवास अभिवादन

26

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

भोयगांव(दि.6डिसेंबर):- स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. झेड. निखाडे यांचे अध्यक्षतेखाली महापरिनिर्वाणदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून, श्री. डी. डी. ठाकरे, श्री. जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, कु. एस. एन. गाडगे, श्री. डी. टी. पानघाटे (वरिष्ठ लिपिक) श्री. श्रीमती सुरेखा पिपळशेंडे श्री. डी. आर. चिने उपस्थीत होते.भारतरत्न,महामानव,परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण,मेणबत्ती प्रज्वलित अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन श्री. एम. ए. अरके यांनी केले. याप्रसंगी प्रथमेश माहुरे, कु. संघर्षा भगत , साहील गेडाम, कु. वैष्णवी लोंढे कु. मानसी वरारकर आर्यन आत्राम, तुषार गोहणे या विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

याप्रसंगी लांडे सर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आर्थिक तांत्रिक व जैविक आक्रमणापासून समाज, देश व जगाचे रक्षण करणे हीच खरी महामानवाला आदरांजली ठरेल असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. निखाडे सर यांनी ज्ञानाचे व वाचनाचे महत्व सांगितले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही. टी. वैद्य तर आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.