उमरखेड येथे बंधुता मानव साखळी- एमपीजे च्या बंधुता अभियाना अंतर्गत उपक्रम

28

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 7 डिसेंबर):-समाजातील विविध संप्रदायांमध्ये आपापसात बंधुता नांदावी यासाठी वातावरण निर्मिती व्हावी या उदात्त उद्देशाने संपूर्ण राज्यात दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिवस ते दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस पर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे.

अभिमानाचे औचित्य साधून उमरखेड येथे मानव साखळी चे आयोजन करण्यात आले. बंधुता मानवसाखळीची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली.

गांधी चौक, माहेश्वरी चौक, डॉ . बाबा साहेब आंबेडकर चौकात मानव साखळी तयार करून संविधानाविषयी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आदी विषयी घोषणा, हस्त फलका व्दारे जन जागृती करून बंधुता प्रस्तापित व्हावी या दिशेने प्रयत्न करण्यात आले.

येथे यावेळी व्हि. एच हनवते, सुनिल चिंचोलकर , चुन्नुमिया काझी , रसुल पटेल , प्रा के व्ही शिंद ,कृषी महाविद्यालयाचे रा सो . यो . का अधिकारी व्ही . बी . शिंदे , शुद्धोधन दिवेकर , रेखा ताई गायकवाड, प्रा.अनसार हुसैनी डॉ. फारूक अब्रार, मोहसीन राज, मनोज राठोड शहराध्यक्ष मुळावा, मांहसीन खान, उपाध्यक्ष मुळावा , राजु लोखंडे , अ. अजीज,अ .जहीर हमिद ,सर्फराज राज अहेमद सह सचिव आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान के सम्मान मे हम है मैदान मे, हिंदू – मुस्लीम -सिख – ईसाई आपस मे है भाई भाई, संविधाना ला अपेक्षित बंधुता -हिच आमची मानसिकता, विविधतेत एकता-हीच आमची क्षमता,बंधुता प्रस्थापित होते जेव्हा- मिळते न्याय – स्वातंत्र्य – समता तेव्हा,घरात विविधता -कार्यालयात विविधता – धर्मात विविधता -तरी आपण एक !हीच खरी बंधुता!असे अनेक घोष वाक्याचे फलक तसेच संविधान उद्देशिकाचे बॅनर सह संविधान प्रेमी नागरीक व सामजिक संघटने चं कार्यकर्ते व पंजाबराव कृषी महाविद्यालयाचे विध्यार्थी – विध्यार्थिनी यांनी सहभाग घेतला.

डॉ.बाबासाहेब पुतळ्या ला हार घालून तिचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले . वकत्यांनी आपली मते मांडली उद्देशीकेच्या वाचनानंतर हा का उपक्रम संपला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद हमिद,शाहेद इकबाल , अजहर खान ,तस्लीम अहमद, समीर मुस्तफा ,जावेद खान ,जरीब खान ,प्रकाश चव्हाण, शेवाळे ,मिनाज अहमद, सर्फराज अहेमद, आनंद मुनेश्वर , कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.