गुंतवणूकदारांचा 19 डिसेंबरला “बांगड्या घाला मोर्चा”

85

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.11डिसेंबर):-लोकाधिकार परिषदेच्या वतीने काल दिनांक 10 डिसेंबर 2022 ला मैत्रेय चा बालेकिल्ला जळगाव येथे बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब म्हणाले ज्यांना आपल्या लोकांचं भलं करायचं असते ते प्रत्येक निमित्ताच्या सोनं करतात. नागपूर हिवाळी अधिवेशन हे एक आपल्यासाठी निमित्त आहे. मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे परत मिळावे यासाठी शासनाने कुटील कारस्थान केले आहे. MPID कायदा हा कायदा गुंतवणूकदार व प्रतिनिधींचा भल्याचा नाही असेही भाऊसाहेब म्हणाले. MPID कोर्टामध्ये केस दाखल करताना शासनाने केलेल्या चुका त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी व त्या दुरुस्त करण्यासाठी 19 डिसेंबरला” बांगड्या घाला मोर्चा” आयोजित केला आहे.

महाराष्ट्र सहित अन्य राज्यातील 2 कोटी महिलांना फसवणुकीसाठी प्रवृत्त करणारे मैत्रेय उद्योग समूहातील सीनियर प्रतिनिधींना ही पत्र लिहून मी आवाहन केले की हा मोर्चा काही एकट्या लोकाधिकार परिषदेचा नसून मैत्रेय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना त्यांचे पैसे कसे परत मिळावे यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी आहे. म्हणून या मोर्चामध्ये मैत्रेयच्या नावाने ज्या ज्या लोकांनी संघटना बनविले आहेत त्या सगळ्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहिजे असेही लोका धिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब म्हणाले.

बैठकीमध्ये मोर्चाच्या संबंधित पोस्टर, बॅनर, बॅचेस, पॉम्पलेट ही सगळी सामग्रीचे वितरण करण्यात आले.जळगाव येथील गुंतवणूकदार व प्रतिनिधींमध्ये जबरदस्त उत्साह बघायला मिळाला सगळ्यांनी पोस्टर बॅनर सोबत आपल्या फोटो सुद्धा काढल्या. लोकाधिकार परिषदेच्या सचिव मायाताई उके वर्षा सतपालकर ह्या राज्याच्या 31 कोर्टामधून फरार घोषित करण्यात आले आहेत. राज्य सरकार कडे कितीतरी प्रकारचे पावर असल्यानंतरही एक महिला यांना सापडत नाही तर अशा राज नेत्यांना बांगड्या घालायला देणे आवश्यक आहे म्हणून 19 डिसेंबरला” बांगड्या घाला “मोर्चाचे आयोजन केले आहे असे म्हणाल्या.

बैठकीला मैत्रेय उद्योग समूहातील सीनियर प्रतिनिधी तराडे सर,संजय शेजवलकर, कितीतरी गणमान्य सीनियर प्रतिनिधी व गुंतवणूकदार प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीची अध्यक्षता बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष जगदीश तेलंग यांनी केली.बैठकीचे संचालन बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जवरे यांनी केले बैठकीचे आभार प्रदर्शन कराडे सर यांनी केले. बैठकीला बुलढाणा जिल्ह्याचे कोषाध्यक्ष प्रमोद बोंबटकर,विकास मानकर,दिलीप इंगळे,नूर भाई मोहम्मद,साबीर शेख उस्मान.आदींनी बैठकीला यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम केले.

https://www.purogamiekta.in/2022/12/10/56803/