महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समीती नागभीडची आढावा बैठक

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 नागभीड(दि.10डिसेंबर):- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती नागभीडची आज दिनांक १०/१२/२०२२ ला विश्राम गृह नागभीड येथे आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मागील सभेचा वृतांत वाचुन कायम करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा समीतीचे राज्य समन्वयक रामभाऊ डोंगरे यांची उपस्थिती होती. सभे अनेक चमत्कार करुन दाखवन्यात आले. त्यामुळे कार्यकर्ते मंञमुग्ध झाले होते. अनेक विषयावर यावेळी साधक बाधक चर्चा झाली.

कार्यकर्त्याच्या मनातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याकडुन चमत्काराचै प्रयोग करवुन घेण्यात आले. जवळ जवळ तिन तास हा कार्यक्रम सुरु होता. संपुर्ण तालुक्यात महा.अनिस जन जागृती करुन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणार आहे. समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट रुढी, प्रथा, परपंरा आहेत. यातुन मारामारी होतात. त्यामुळे महा.अनिस जनजागृती करुन समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणार आहे. प्रत्येक चमत्कारा वैज्ञानिक कारण आहे. हे समाजाला पटवुन देणार आहे. यासाठीच महा.अनिस कार्यकर्त्यांना चमत्कार प्रयोगाचे धडे देत आहे. प्रास्तविक अरुण पेंदाम यांनी केले तर आभार आनंद मेश्राम यांनी केले.

उमरखेड तहसीलदाराने संविधान दिन का ? साजरा केला नाही -भिम टायगर सेना