आदिवासी विकास मंत्र्याना दिले बिरसा ब्रिगेडने निवेदन

35

🔸आदिवासींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नऊ कलमी मागण्याचे निवेदन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

 पुसद(दि.11नोव्हेंबर):-1झयेथील आदिवासी समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजनेची अंमलबजावणी करणे बाबत नऊ कलमी मागण्याचे निवेदन बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे तथा तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांच्या पुढाकारातून आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना देण्यात आले.

आज दिग्रस येथे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे शासकीय वस्तीगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास आले असताना आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. आदिवासींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने काम करण्यासाठी आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली आहे. परंतु अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने आदिवासींवर अन्याय होत आहे. त्यामुळे पुसद येथे 75 क्षमतेचे वसतिगृह आहे. आणि प्रवेशासाठी अर्ज जास्त येतात त्यामुळे पुसद येथे वस्तीगृहातील मुलींचे व मुलांचे प्रत्येकी 250 क्षमता वाढीव करण्यात याव्या.

ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येईल अशी मागणी करण्यात आली. तर आदिवासी बहुल असलेल्या महागाव तालुक्यामध्ये जवळपास 45 हजार आदिवासी लोकसंख्या आहे. तेंव्हा बोरीवन येथील बंद पडलेली शासकीय आश्रम शाळा ही महागाव तालुक्यामध्ये इंग्रजी मीडियम पुनरस्थापित करण्यात यावी. जेणेकरून येथील आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात संधी मिळेल. अशी शैक्षणिक प्रगती ची मागणी सुद्धा निवेदनातून करण्यात आली. पुसद प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सात तालुक्यासाठी येणारा ठक्कर बाप्पाचा निधी तीन वर्षापासून मिळाला नाही. तोही देवून आदिवासी वस्ती, वाड्याचा विकास साधावा अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. आदिवासी वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पुसद तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात ॲट्रॉसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष सूचना पोलीस विभागाला देण्यात याव्या. यवतमाळ जिल्ह्यातील मागील पाच वर्षातील आदिवासींनी दिलेल्या तक्रारींच्या प्रकरणात सखोल चौकशी अहवाल बोलावून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करून अत्याचाराचे प्रकरणे उजागर करण्यावर निवेदनातून जोर दिला आहे. आदिवासीच्या जमिनी गैर आदिवासींनी बेकायदेशीरपणे बळकावून ठेवल्या आहेत त्या परत आदिवासींच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने दाखल असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात तहसीलदार यांच्याकडील प्रकरणे व आदिवासींच्या गैरआदिवासींच्या ताब्यातील शेत जमिनीचा शोध लावून त्याही प्रकरणात जिल्हाधिकारी यवतमाळ यांना विशेष निर्देश देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

जेणेकरून आदिवासींवर येत असलेली उपासमारीची परिस्थितीवर मात करता येईल. अशी शेतजमिनीच्या प्रकरणातून होणारी आर्थिक लुटी ची परिस्थिती आदिवासी विकास मंत्र्यांसमोर मांडून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच दुसरा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी समाजातील सण, उत्सव, लग्नविधी, विवाह सोहळे व विविध प्रबोधन कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर आदिवासी सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जागा व निधी उपलब्ध करून मिळणे बाबत. सुद्धा मागणी करीत त्यावर सुद्धा त्वरित दखल घेऊन उपाय योजनेची मागणी केली आहे. यासोबतच शासकीय आश्रम शाळा व मुला मुलींचे वस्तीगृह बांधकामासाठी प्रकल्प कार्यालयाला निधी उपलब्ध करून देण्यात यावा. आदिवासी समाजातील बेरोजगाराचा प्रश्न मिटविण्याच्या दृष्टीने स्पेशल आदिवासी नोकर भरती करण्याची उपाययोजना करण्यात यावी.

तसेच सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगांमध्ये संधी मिळण्याच्या दृष्टीने न्यूक्लिअस बजेटमधील लाभार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने वाढीव निधीची उपलब्धी करण्यात यावी. अशा नऊ कलमी मागण्याचे निवेदन बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे पुसद व तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांच्या पुढाकाराने ब्रिगेडच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना निवेदन सादर केले. तसेच या सर्व बाबी आदिवासींच्या विकासाच्या दृष्टीने गरजेच्या असल्याने त्याची त्वरित दखल घेऊन व आवश्यक अध्यादेशाद्वारे या सुविधा उपलब्ध करून द्यावा अन्यथा नाईलाजास्तव बिरसा ब्रिगेड ला आदिवासी समाजाला शैक्षणिक व सामाजिक व आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदनाची दखल घेऊन लवकरच मागण्याची पूर्तता होईल असे यावेळी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.या निवेदनावर विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे,तालुका अध्यक्ष मारोती भस्मे ,विठ्ठल मिरासे, पंकज वंजारे,अक्षय व्यवहारे,अशोक खंदारे ,सखाराम इंगळे,गजानन भोगे, राजू पेदेवाड,व बिरसा ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या सहीनिशी निवेदन दिले.