शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतने ग्रामसभेद्वारा देशी दारू दुकानाला दिलेली नाहरकत रद्द करण्यात यावे..!!

30

🔸ग्रामस्थांची निवेदनातून मागणी
___________________________
✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.12डिसेंबर):-तालक्यातील शेंबाळपिंपरी ग्रामपंचायतने ग्रामसभेद्वारा देशी दारू दुकानाला दिलेली नाहरकत रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तक्रार दिली आहे.तसे निवेदन दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी पंचायत समिती कार्यालयार धडक देत गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रशासन दप्तरी अतिसंवदनशील असलेल्या शेंबाळपिंपरी आधिच देशी-विदेशी व गावठी दारुचा महापुर असतांना काही संधीसाधू गावपुढारी आपल्या वैयक्तीक आर्थीक स्वार्थासाठी गेली अनेक दिवसांपासुन देशी दारुच्या दुकानाला परवानगी देण्याच्या प्रयत्नात होते. त्याच दृष्टीने अनेक त्रुटया ठेवत दि.२३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेत काही ठरवून आणलेल्या व्यक्तीच्या अनुमोदनावर देशी दारुचा ठराव पारीत करुन घेतला.

ग्रामसभेच्या नोटीसबोर्डवर असेलल्या सुचनापत्रात ग्रामस्थांना न समजण्याच्या भाषेत अर्थात वाणिज्ज विषयक असा शब्द प्रयोग करून ग्रामसभेत देशी दारू दुकानाचा असंवैधानिक पध्दतीने ठराव पारित करुन घेतला. तो रद्द व्हावा.सदर ग्रामसभेची व्यापक प्रसिध्दी केली नाही, दवंडी दिली नाही तसेच चौका चौका नेहमीप्रमाणे सुचनापत्रही चिटविले नाही. त्यामुळे सदर ग्रामसभा खऱ्या अर्थी नागरीकांची नव्हतीच.प्रस्तावित दुकान बसस्थानक परिसरात भरवस्तीत प्रामुख्याने अनुसुचित जातीच्या रहीवासी वस्तीत असल्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वधर्मीय महिलांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे सदरील दुकानाचा ठराव रद्दबादल करावा.शेंबाळपिंपरी हे गांव तिन जिल्ह्याच्या सिमेवर असल्यामुळे अवैध व्यवसाय व विशेषत्वे दारुमुळे भुतक अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत.

त्यामुळे येथे इतर जिल्ह्यातील उपद्रवी लोकांचा नेहमीच संचर असतो त्यात वाढ होवून ग्रामस्थांना असुरक्षीततेची भावना वाढणार आहे. हे योग्य नाही म्हणून समस्येचे मुळ हा देशी दारू दुकानाचा ठराव रद्द करावा. सदर प्रस्तावित दुकानाची मालमत्ता क्रमांक १५२१ शे.स. ८ प्लाट क्र. १ मालक शिवाजी कांबळे यांचे जागेत होत आहे.त्या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी त्या दुकानाचा ठराव रदबादल करावा अशी विनंती अर्चना आंभोरे गुलाब वाहुळे, जुनैल सिद्दिकी,माधव मनवर, संतोष कांबळे, सतीश कांबळे, सुप्रिया मनवर यांनी निवेदनातून केली आहे