सर्व प्रकारचे व्यावसायिक शिक्षण आयटीआय मध्ये दिले जाते-प्रा. कुंभारे

92

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.12डिसेंबर):-दि. 12 ते 16 डिसेंबर 2022 हा स्कूल कनेक्ट सप्ताह चालू आहे. त्यानिमित्त उमरखेड मधील सर्व विद्यालयात जाऊन मार्गदर्शन देण्यात येत आहे.

भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड येथे अशोक वृक्षाच्या छायेखाली भव्य प्रांगणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळेस कुंभारे सर देशमुख सर दामोधर सर चव्हाण सर या मान्यवरांचे विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळेस विद्यालयातील आठ ते दहाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देशमुख सर कुंभारे सरांनी केले.

यावेळेस कुंभारे सरांनी मार्गदर्शन करते वेळेस औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात 435 आहेत.एकूण 103 ट्रेडमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. उमरखेड येथे 9व्यवसाय आहेत. यावर्षी दोन व्यवसायाला नवीन परवानगी ब्युटी पार्लर वर ड्रेस मेकिंग यांना देण्यात आली. दिवसेंदिवस आयटीआय चे महत्व वाढत चाललेले आहे. यावेळेस 93% टक्क्याचा विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला आहे. एक हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले होते. त्यापैकी 222 विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायात प्रवेश मिळाला कमीत कमी वेळात शिक्षण घेऊन अर्थार्जन प्राप्त करू शकतो. स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. विशेष म्हणजे 30 टक्के जागा मुलीसाठी राखीव असतात देशात ज्या वस्तू तयार होतात त्या प्रत्येक वस्तू आमचे विद्यार्थी तयार करतात याचा आम्हाला अभिमान आहे. तर देशात विदेशात अमेरिका दुबई कुवेत रशिया या देशात सुद्धा आयटीआय चे विद्यार्थी गेलेले आहेत एटीएम सारखा पैसा झळझळ तुमच्या हातात खेळतो असे त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादराव मिरासे यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आज आपला विद्यालयाचा भाग्याचा दिवस आहे. सुंदर असे मार्गदर्शन लाभले याचा फायदा विद्यार्थी नक्कीच घेणार असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास माने सर शेख सर अल्लडवार सर कदमताई चेपुरवार पुरी जाधव यांची उपस्थिती होती. प्रस्तुत कार्यक्रमाचे संचलन व आभार पांडुरंग शिरफुले यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली. विद्यालयातील विद्यार्थ्यांना टेक्निशियन माहिती भरपूर मिळाली त्याबद्दल विद्यार्थी खुश होते.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी