धोंडराई ग्रामपंचायत निवडणूकीत शितल साखरे ठरणार परिवर्तनाच्या शिलेदार

28

🔹दुरंगी लढतीकडे गेवराई तालुक्यातील जनतेचे लागले लक्ष

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.16डिसेंबर):- तालुक्यातील धोंडराई ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होत असून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार कु.शितल अशोक साखरे तर भाजप-शिवसेना पुरस्कृत ग्रामस्वराज्य जनसेवा विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.सुवर्णा संतराम काळे यांच्यात अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु उच्च शिक्षीत असलेल्या सरपंच पदाच्या उमेदवार कु.शितल अशोक साखरे यांना धोंडराई ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व स्तरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून खऱ्या अर्थाने त्या या गावासाठी परिवर्तनाच्या शिलेदार ठरणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

धोंडराई ग्रामपंचायत निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी सकाळी बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित तसेच सैराट चित्रपटात आर्चीच्या वडिलांची भूमिका केलेले सुरेश विश्वकर्मा व लंगड्याची भूमिका बजावणारे तानाजी गालगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जी प्रचार सभा घेण्यात आली त्या सभेला महिला, तरूण वर्ग, पुरूष मंडळी यांची न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. या गर्दीचा उच्चांक पाहून सरपंच पदाच्या उमेदवार कु.शितल अशोक साखरे आणि त्यांच्या पॅनलचे सदस्य पदासाठी उभे असलेले १७ उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार असा अंदाज बहुतांश मतदारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेना प्रणित ग्रास्वराज्य जनसेवा विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार – सौ.सुवर्णा संतराम काळे यांचा प्रचार देखील जोरदारपणे सुरू आहे. तसेच या निवडणूकीत सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून मनिषा बाळासाहेब कुटे या देखील निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कु.शितल अशोक साखरे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असून मतदारांचा सुध्दा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मतदारांनी गावाची सेवा करण्याची संधी दिली तर औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा या गावाच्या धर्तीवर धोंडराई गावाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा विश्वास कु.शितल साखरे यांनी ग्रामस्थांना दिला आहे. त्यामुळे धोंडराई ग्रामपंचायत निवडणूकीत उच्च शिक्षित असलेल्या सरपंच पदाच्या उमेदवार कु.शितल अशोक साखरे या नक्कीच परिवर्तनाच्या शिलेदार ठरणार अशी चर्चा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांकडून ऐकावयास मिळत आहे.