वंचित बहुजन आघाडी येवला तालुका उपाध्यक्ष साहेबराव भालेराव समाजरत्न २०२२ पुरस्काराने सन्मानित

90

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.17डिसेंबर):- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ पुणे येथील निळू फुले नाट्य गृह येथे राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा २०२२ आयोजित करण्यात आला होता यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष साहेबराव भालेराव यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री खोब्रागडे साहेब,तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते अनंत जोग ,सकाळ समूहाचे संस्थापक संदीप काळे,पोलिस निरीक्षक सुप्रिया पंढरपूर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड तर स्वागताध्यक्ष ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बनसोडे हे होते

या पुरस्कार सोहळ्या अंतर्गत येवला तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव भालेराव यांनी.सामाजिक बांधिलकी जपत कोरॉना काळात वंचित ,गरजू घटकातील लोकांना मदत तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता तालुक्यातील व गावातील नागरिकांना कोरोना काळात दवाखण्यापर्यांत पोहचवणे, गरिबांना भाजीपाला,फळे,इतर गरजू वस्तू वाटप केले तसेच सर्वसामान्यांचा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रेरणादायी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्रद्धेय आदरणीय अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करून पक्षानेही त्यांना तालुका उपाध्यक्ष हे पद जाहीर करून समाजसेवेची संधी मिळाली आहे.

म्हणून त्यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी येवला तालुका वतीने सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी साहेबराव भालेराव,संजय पगारे,दिपक गरुड,प्रभाकर गरुड,पोपट खंडांगले,आदी नी अभिनंदन केले