माणुसकीचे दर्शन; सापडलेले पाकीट प्रामाणिकपणे केले परत..!

30

🔸पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कैलास मोरेचे कौतुक..!

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.19डिसेंबर):-‘काळ बदललाय… आता कोण प्रामाणिक राहिलंय?’ असा सूर अनेकवेळा ऐकायला मिळतो. परंतु, आजच्या युगातही प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण तलवाड्यातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणाच्या कृत्यातून समोर आले आहे. पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणा दाखवत त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन परत केले. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या युवकाचा हा प्रामाणिकपणा कौतुकास पात्र ठरला आहे.

तलवाडा येथील पांगरी रोडवरील सुर्यांश के.स.के. पेट्रोल पंपावर काम करणारा युवक कैलास बाबूराव मोरे हा गेल्या पाच वर्षांपासून तलवाडा येथील सूर्यांश पेट्रोल पंपावर काम करीत आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच. दोन एकर शेती असून; तीही कोरडवाहूच. काम केल्याखेरीज काही पर्याय नाही म्हणून पांगरी रोडवरील सूर्यांश के.एस.के. पेट्रोल पंपावर ७००० हजार रुपयांवर काम करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. दि.१६ डिसेंबर वार शुक्रवार रोजी दुपारी पेट्रोल पंपावर ड्युटीला जात असताना पेट्रोल पंपाजवळ सदरील पाकीट सापडले. त्या पाकिटामध्ये ८५०० रुपये रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन कार्ड व आधारकार्ड वरती बोराडे अमोल नामदेव असे नाव होते.

तरी सदरील पाकीट हरवलेली व्यक्ती गंगावाडी येथील असून; याचा आपण शोध घेतला पाहिजे असे त्याला वाटले. त्या पैशाचा कसलाही मोह न करता; कैलास बाबूराव मोरे याने गंगावाडी येथील त्याचे परिचित कांबिलकर यांना फोन करून कल्पना दिली व ते पाकीट तलवाडा येथे वेल्डिंगचे काम करणारा बोराडे अमोल नामदेव यांचे आहे असे कळाले. तात्काळ कैलास मोरे यांनी त्यांना सूर्यांश पेट्रोल पंपावर बोलावून सापडलेले पाकीट बोराडे अमोल यास परत दिले. बोराडे अमोल याने कैलास बाबूराव मोरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व धन्यवाद मानले. त्याच्या या प्रामाणिकपणाची सर्व परिसरामध्ये चर्चा व कौतुक होत आहे.

https://www.purogamiekta.in/2022/12/19/57166/

https://www.purogamiekta.in/2022/12/19/57163/