महाविद्यालयीन जीवनातील रूममेटच्या सहवासात घालवलेले अविस्मरणीय क्षण

34

दोस्त वफादार हो तो अलग
ही किस्सा होता है
सच्चा दोस्त ही तो जिंदगी
का अहम हिस्सा होता है..!

बऱ्याचदा महाविद्यालयीन जीवनात वाटचाल करत असताना आपल्याला बसने प्रवास करावा लागतो किंवा गावामध्ये बस सेवा उपलब्ध नसल्याकारणाने भाड्याने रूम करून राहावे लागते म्हणजे आत्तापर्यंत घराच्या बाहेर न पडलेला विद्यार्थी हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी रूमवर राहायला लागतो त्याच्यासाठी सर्व काही अनोळखी असतात ते शहर तो परिसर ते आजूबाजूची माणसे किंवा आपल्या रूममध्ये असणारी अनोळखी वाटणारी माणसे मी ही बीए द्वितीय वर्षाला असताना कोरोना महामारीच्या काळामुळे आमच्या गावची बस सेवा बंद होते आणि महाविद्यालय सुरळीत पूर्वीसारखेच सुरू झाले होते तेव्हा नियमित कॉलेजला जाणे भाग पडायचे तर खाजगी वाहनाने गेल्यास तिकीटही भरपूर लागायचं आणि बऱ्याचदा बसण्यासाठी जागा नसल्याकारणाने मागे लटकून स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागायचा आणि घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर हा जवळपास दहा अकरा तासाचा प्रवास यामध्ये सर्व टाईम निघून जायचा आणि घरी आल्यानंतर अभ्यास करावासा वाटत नव्हता कारण डोळे आणि शरीर पूर्ण थकून जायचे आणि जेवण करून झोपावे असे वाटायचं मग मी आणि माझ्या एका मित्राने भाड्याने रूम घेऊन राहण्याचे ठरविले तर मग रूम बघण्यासाठी गेलो असता पुसद येथील विटाळा येथे एक रूम आम्हाला मिळाली आणि सामान पॅक करून आणि रूमवर जायला लागलो.

पहिल्या दिवशी रूमवर गेलो असताना सेकंड फोर ला आमची रूम होती आणि तो परिसर आमच्यासाठी अनोळखी होता किंबहुना त्या परिसरातील माणसे सुद्धा अपरिचित होती आणि आम्ही मेस वगैरे लावणी नव्हती स्वयंपाक स्वतः हाताने बनवायचं आणि खायचं तर हळूहळू बाजूच्या रूम मधील मित्रांची ओळख निर्माण व्हायला लागली आणि मग हळूहळू त्यांच्यात आणि आमच्यात संवाद होत गेला
ज्या ठिकाणी आम्ही राहायचो त्याच्या बाजूलाच दुसऱ्या रूममध्ये विजय कपिल आणि योगेश असे तीन जण राहत होते. फारसा परिचय नसल्याकारणाने संवाद साधला थोडा अवघड जायचे परंतु हळूहळू संवाद साधायला लागलो आणि मग एकमेकांशी चांगली मैत्री जमायला लागली व फक्त दोन महिन्याच्या रूमच्या माध्यमातून यांच्याशी संपर्क आला आणि एक मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले.
कालांतराने आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली आणि मग सर्व काही व्यवस्थित सुरू झाले कारण जेव्हापासून त्यांच्याशी बिनधास्तपणे बोलायला लागलो तेव्हापासून आपण घरापासून दूर राहतोय याची जाणीवच मात्र झालेली नाही कारण इतके प्रेमळ आणि समजून घेणारे रूममेट किंवा शेजारी मला मिळाले होते.

विजय भाऊ हा मोठ्या भावाप्रमाणे समजून सांगायचा तोही भरतीचा अभ्यास करण्यासाठी तेथे आलेला आणि त्याच्या सहवासात गेल्याच्या नंतर त्याच्या रूपाने एक मोठा भाऊ मिळाला जो काय चांगला आहे काय वाईट आहे अशा सर्वच प्रकारे तो समजावून सांगायचा आणि त्याच्या सोबत बोलत असताना जणू काही आपण समवयस्क आहे याचा अनुभव यायला लागायचा विशेषता तो आमच्यापेक्षा मोठा होता अनुभवी होता परंतु आपण मोठ्या असल्याचा अभिमान त्यांनी भरला नाही शिवाय त्याच्या आयुष्यात त्याने अनुभवलेल्या गोष्टीवरून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं.

नंतर कपिल भाऊ सुद्धा असाच होता प्रेमळ मनमिळावू आणि शिस्तबद्ध गंमतच्यावेळी गंमत आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास अशाप्रकारे त्याचा स्वभाव होता पण एका जिवलग मित्रासारखा वागायचा हसण्याने हसवणे हे त्याचे सहभाग होते आणि सर्वात जास्त म्हणजे मला आवडलेली गोष्ट की तो स्वयंपाक फार छान बनवायचा आणि विशेषतः मटणाची भाजी इतकी चविष्ट बनवायचा की त्याचं नाव कधी कुठे निघाला तर सर्वात अगोदर त्याच्या भाजीची आठवण येते आणि लगेच तोंडाला पाणी सुटायला लागत. आणि तिसरा शेजारी मित्र होता योगेश नावाचा आमच्यापेक्षा लहान वयाचा होता आणि थोडा स्टायलिश स्वभावाचा होता परंतु आपण लहान आहोत हे समजून आमच्याशी सभ्य व्यवहार करायचा आणि आम्ही जे काही त्याला सांगेल ते काम तो करायचं परंतु कधीही रागावला नाही किंवा नाही वास्तविक पाहता माझ्या रूम मधील लखन नावाच्या मित्राचं व त्याचा काही फारसा जमायचं नाही कारण एक थांबला तर दुसरा सुरू व्हायचा आणि दुसरा थांबला तर पहिला सुरू व्हायचा पण या दोघांमधील वाद ऐकत असताना आम्हाला फार हसू यायचं आणि आम्ही मनसोक्त असायचं पण खरंच फक्त दोनच महिने राहिलो.

त्यांच्या सहवासात कारण नंतर संचारबंदी लागू झाली आणि घरी यावं लागलं परंतु या दोन महिन्याच्या सहवासात एक मैत्रीचे अतूट नाते तयार झाले. आणि विजय भाऊचा एक मित्र होता अंकुश नावाचा तो कधीकधी रूमवर यायचा आणि मी कवी स्वरूपाचा माणूस तर तो मी लिहिलेल्या कविता ऐकायचा आणि लेखनासाठी मला एक विषय देऊन जायचा तोही माझ्यासाठी एक भावाने व मार्गदर्शक म्हणून लाभला. आता जेव्हा कॉलेजमध्ये त्या वाटेने मी जातो आणि माझ्या रूमच्या दिशेने मी बघतो तर त्या चौघांची आठवण झाल्या वाचून राहत नाही इतके मन त्यांच्यामध्ये रमले होते पण त्यांच्यासोबत जास्त दिवस राहण्यास मिळाले नाही याची मात्र खंत वाटते.

✒️लेखक:-स्वप्निल गोरे(सावरगाव(गोरे)ता.पुसद,जिल्हा यवतमाळ)मो:-8767308689