तांडा सुधार समितीच्या संघर्षयात्रेचे पुसद शहरातजंगी स्वागत..!!

50

🔸याडीकार पंजाब चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पुसदमध्ये भव्य दिव्य स्वागत

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.19डिसेंबर):-येथील अखिल भारतीय तांडा सुधार समीतीच्या माठार येथुन ते गहुली ते नागपूर अधिेवेशन दरम्यान सुरू असलेली संघर्षयात्रा आज पुसदमध्ये दुपारी बारा वाजता येऊन अगमण होताच. याप्रसंगी बंजारा समाजाचे ज्येष्ठ साहत्यिक तथा समीक्षक याडीकर पंजाबराव चव्हाण पुसद यांनी प्रसिद्ध कवी संदीप राठोड यांचे भुक छळते तेव्हा….आणि प्रसिद्ध कवी मनोहर चव्हाण यांचे म तांडो बोलरोछु….हि दोन कविता संग्रह देऊन स्वागत केले. त्यांनी याप्रसंगी बंजारा पुकारचे दिवाळी अंक सुद्धा आंदोलन कर्त्याना भेट दिले.

बंजारा समाजाच्या विविध ज्वलंत मागण्यासाठी माळपठार, प्रेरणाभूमी गहुली ते नागपूर विधान भवन संघर्ष यात्रा काल रीतसर 18/ डीसेंबर रोजी सुरू झाली. माळपठार परिसरात शेतीसाठी पाणी आणि बंजारा समाजाच्या विविध मागण्यासाठी मांजर ,जवळा, बेलोरा, रोहडा, मारवाडी, हिवलणी, खंडाळा, लिंबी मार्गे पुसद येथे पोहोचली.

संजय मदन आडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पायदळ यात्रेतील आंदोलन कर्त्यानी गावा गावातील शेतकऱ्यांच्या समस्येचे निवेदन घेत नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या.या पदयात्रेची शासनाने दखल घेऊन माळपठार आणि बंजारा समाजाचे प्रश्न तत्काळ सोडवावेत अशी सदिच्छा गावागावांतील नागरिकांनी व याडीकार पंजाब चव्हाण यांनी दिली.

माळपठार परिसरात सिंचनाची व्यवस्था झाल्यास स्थलांतर थांबेल, रोजगार मिळेल आणि मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था होईल अशी आशा व्यक्त केली. या पदयात्रेत नामा बंजारा, प्रा.सरदारजी राठोड, राजू रत्ने, धर्मेंद्र जाधव, संजय मदन आडे तालुका अध्यक्ष पुसद, जिनकर सुदाम राठोड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय बंजारा युवा सेना, शेतकरी नेते मनोहर राठोड,सुनिल देवराव चव्हाण सरपंच हिवळणी, मानोरा तालुका अध्यक्ष, रामराव राठोड, कार्याध्यक्ष, एकराज जाधव, धर्मराज आडे आदींनी सहभाग घेतला.