मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्य शासनाचा जाहीर निषेध !

33

🔹जयंत पाटील यांचे निलंबन रद्द करन्याची मागणी !

🔸निलंबन रद्द न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आंदोलनाचा इशारा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.23डिसेंबर):-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांना विधानसभा सभागृहातून अधिवेशन काळापुरता निलंबित करण्यात आलं आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत असून सरकारच्या या निर्णयाचा मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करून जयंत यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी तहसीलदार सागर ढवळे यांच्यामार्फत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या हुकुमशाही कृतीचा निषेध केला आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात वारंवार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नशिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर अजिबात चर्चाच होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. 

दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता. म्हणूनच जयंत पाटील यांनी सदनात उभे राहून ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणाले. मात्र, विरोधकांचा आवाज दाबण्याच्या आणि विरोधकांवर वचक बसवण्याच्या उद्देशानं सरकारनं यास वेगळा रंग दिला.

जयंत पाटील यांनी विधान अध्यक्षांना उद्देशून तसं बोलल्याचा बनाव केला गेला व जयंत पाटील यांना हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे, जयंत पाटील यांना निलंबित केलं असलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढतच राहीन, असं मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठणकाऊन सांगण्यात आल असून शिंदे सरकारने जयंत पाटील यांचं निलंबन केल्याचा जाहीर निषेध करून तत्काळ निलंबन रद्द कराव अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आला.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष वृषालीताई विघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, डॉ प्रदीप कुऱ्हाडे, विलास राऊत, मोहन मडघे, अशोक ठोंबरे, विनोद ठोके, विलास ठाकरे, राजेश पाटील, अमोल सोलव, आनंद सदातपुरे, मयूर राऊत, गोपाल मंत्री, शरद उमाळे, प्रताप साबळे, रजेशसिंग टाक, रोशन राऊत, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.