रेपोस एनर्जीच्या नवीन अॅन्टी थिप टेक्नॉलजीचे अनावरण

38

🔸डिझेल चोरी ,अनावश्यक वापर, ताळतंत्रच्‍या आभवणे होणारे  १०%  नुकसान याला  आळा घालण्यास सक्षम तंत्रज्ञान

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.26डिसेंबर):-भारत-रेपोस एनर्जी हे भारतातील घरोघरी इंधन पोहचविणारी  डिलिव्हरी उद्योगातील नविन स्टार्टअप कंपनी असुन   त्यांनी पुण्यातील चाकण येथील कंपनीच्या फॅक्टरी मध्ये   ‘फ्युल रेव्हल्युशन’ च्या अंतर्गत डिझेल मधील चोरी तसेच त्यांची इंत्यभुत माहिती मिळावील याकरता . DATUM (डेटा ऑटोमेटेड टेलर अल्टिमेट मशीन) नावाचे हे नवीन तंत्रज्ञानाने परीपुर्ण अशा मशीनची निर्मिती केली आहे.लवकरच हे मशीन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

विविध शहरात मेट्रो,रस्ते बांधणी,पुल, दुर्गम भागात सुरु असणा-या कामावरील वाहनांना डिझेलची सातत्याने गरज भासत असते. त्यामुळे संबंधित कंत्राटदार हा डिझेल बँऱलमधुन भरुन साईटवर घेऊन येतो. तेव्हा पंपापासुन ते साईटपर्यत डिझेल पोहचोपर्यत डिझेल चोरी होणे,अनावश्यक वापर करणे याचे ताळतंत्र राहत नाही. आणि व्यावसायिक हे दहा टक्याचे नुकसान गृहित धरुन काम करत असतो. याला आता आळा घालण्याकरत रिपोझ एनर्जीने आता डँटम हे मशीन तयार केले असुन कंत्राटदारास एकाच ठिकाणी डिझेल उपलब्ध होणार आहे.तसेच या मशीनच्या सर्व  तांत्रिक गोष्टी या मोबाईल मध्ये अँपच्या माध्यमातुन जोडलेल्या असल्यामुळे कंत्राटदारास कामागाराने किती डिझेल वापरले,कोणत्या गाडीस किती डिझेलची गरज भासते याची इंत्यभुत माहिती आता या मशीनच्या माध्यमातुन मिळणार आहे.अशी माहिती कंपनीचे प्रमुख चेतन वाळुंज आणि आदिती भोसले-वाळुंज यांनी दिली.

ज्या व्यवसायांना आपली व्यावसायिक उपकरणे, यंत्रसामग्री आणि वाहतुकीच्या साधनांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी आणि स्टोरेजची गरज असते त्यांच्यासाठी हा एक सर्वात चांगला उपाय आहे. भारतात विविध ठिकाणी ३०० हून अधिक डेटाम स्थापित केले गेले आहेत आणि डिझेलचे काही प्रमुख ग्राहक आहेत एल अॅण्ड टी, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, अदानी पोर्ट, अदार पूनावाला क्लीन सिटी, भारतातील प्रमुख मायनिंग बेल्ट इ. हे सर्व DATUM सक्षम असुन त्यांची डिझेल बचतही होते . रेपोस ६.७ मिलियन मेट्रिक टनांहुन अधिक कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी कार्यरत आहे. 

रेपोस एनर्जी ने भारतातील ऊर्जा वितरण क्षेत्रात शोधांसाठी चार पेटंट मिळवले आहेत, या आठवड्याच्या सुरुवातीला, भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने रेपोस एनर्जी मोबाईल पेट्रोल पंपाच्या डिझाइनसाठी हे नवीन पेटेंट दिले आहेत. 

इंडस्ट्री टायटन रतन टाटा यांच्या पाठिंब्याने, रेपोस एनर्जी ई-कॉमर्स ऑफ एनर्जीच्या स्थापनेसह जगाला कार्बन-न्युट्रल फ्युचरकडे वाटचाल करण्यास मदत करण्याची मोहीम चालवत आहे. भारतातील २८०हून अधिक शहरांमध्ये मोठी उपस्थिती, १५०० हून अधिक मोबाईल पेट्रोल पंप, बी२बी उद्योगाला १० करोड लिटर (१०० दशलक्ष लिटर) इंधनाची विक्री (डिझेल मार्केटमधील ८५%), आणि ९९ लाख झाडांच्या लागवडीचे उदिष्ट साध्य करण्यासाठी रेपोस एनर्जीने आपल्या ध्येयाच्या दिशेने उचललेले हे मोठे पाऊल आहे. 

भारतातील बी२बी डिझेल मार्केटमध्ये अनादी काळापासून कोणत्याही तंत्रज्ञानाने समृद्ध नवकल्पना दिसून आल्या नव्हत्या , कित्येक उद्योग सध्या ज्या प्रकारे इंधन खरेदी करतात त्यामुळे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाला लक्षणीय नुकसान होत आहे. 

यावेळी अदिती वाळुंज, चिफ व्हिजनरी ऑफिसर आणि फाऊंडर, रेपोस एनर्जी, म्हणाल्या, “DATUM हा एक अनोखे पेटंट इनोव्हेशन आहे जे आम्हास ६.७ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात मदत करेल. आमच्यासाठी हे एक मोठे यश असुन आम्ही ऊर्जा वितरणाचे परिवर्तन करण्याच्या आणि जगाला कार्बन न्युट्रल भविष्याकडे वाटचाल करण्यात मदत करण्याच्या आमच्या ध्येयानुसार कार्यरत आहोत. DATUM आमच्या ग्राहकांना डिझेल वापरावेळी १० टक्के बचतीची हमी देईल आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्बन उत्सर्जन कमी होईल, याचसोबत आपल्या देशातील राष्ट्रीय पर्यावरणीय उद्दिष्टांना देखील समर्थन मिळेल. आज आमच्या चाकण फॅक्टरी साइटवर या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षमतेचे प्रदर्शन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”