वामनदादा कर्डक जन्मशताब्दी निमित्त “संवेदना जागृती कवी संमेलन” संपन

42

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.25 डिसेंबर):- रोजी येथील श्री संत जनाबाई महाविद्यालयात संत जनाबाई साहित्य मंडळ व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त द्विभाषिक “संवेदना जाग्रती-कवी संमेलन” मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

“आंबेडकरी कवी स्वतःसाठी कधीच लिहीत नाहीत, पुरस्कारासाठी तर कधीच लिहीत नाहीत. ते समाजाला पुरस्क्रत करण्यात साठी लिहीतात.”असे वक्तव्य कवी संमेलनाचे उद्घाटक विद्रोही कवी, लेखक, विचारवंत प्रा.डॉ. आनंद इंजेगावकर यांनी केले. विशेष अतिथी हिंदीचे प्रसिद्ध कवी, लेखक, आलोचक,अनुवादक प्रा.डॉ. संजय जाधव यांनी,'”महाकवी वामनदादा कर्डकांची कविताही परंपरागत साहित्य शास्त्राच्या मानदंडांना झुगारून मानसाचे गीत गाते.” असे मत मांडले. उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांनी, “संवेदना जाग्रती-कवी संमेलन हे नव कवींना प्रेरणा देण्याचा उपक्रम आहे.” विचार प्रतिपादित केले. कवी संमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध कवी भीमराव हटकर हे म्हणाले की, “समाजाला वास्तवाचे भाण देणारे व आयुष्य भर मानवतेचं क्रांती गीत गाणारे महाकवी वामनदादा कर्डक हे युग प्रवर्तक कवी म्हणून साहित्य-संस्कृती नभांगणात अजरामर राहतील.” उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सातपुते यांनी सहभागी कवींना सुभेच्छा दिल्या.

कवी संमेलनाची सुरुवात संत जनाबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी चि.रविराज मोहनराव डमरे यांना डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भाषण स्पर्धेत “नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुरस्कार” प्राप्त झाल्या बद्दल पिता-पुत्राचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांचा व सहभागी कवींचा सत्कार करण्यात आला.

संमेलनात एका पेक्षा एक दर्जेदार कविता सादर करण्यात आल्या. त्यामध्ये नव कवी सिद्धार्थ कांबळे यांनी, “भीम सूर्या तू तळपतो हे पाहून, लोक धम्म स्वीकारती नागपुरला जाऊन.” तर उत्तम अवचार यांनी, “युग पुरुष बाबासाहेब” कवितेत, “जगी जन्मा आला एक मानव जातीसाठी हीरा. वंदन माझे महामानवा जयभीम क्रांती वीरा.” अभिवादन पर कविता सादर केली. प्रा.गोरखनाथ धाकपाडे यांनी, “आमच्या जीण्यातल दुख आता विराया लागल.भीम क्रांतीच वार हे फिरायला लागल.” यशवंत मस्के, ” शब्दां मधूनी क्रांती साठी पेटती आग वामनदादा. भीम युगाच्या मुकुटावरचा चमकता भाड वामनदादा. राम साळुंखे यांनी, “आज माणसे कसी सभ्यतेचा मुखवटा घेऊन दिवसा ढवळ्या राक्षसां सारखी फिरतात तेव्हा लोक भयभीत होतात. म्हणून लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.” उत्तम काळे यांनी, “निवडणूकीच्या काळात नेते आश्वासने देतात. निवडून आल्यावर आश्वासना सहितखातात.” असा रोष वर्तमान नेत्यांवर व्यक्त केला. हास्य-व्यंग कवी नाथराव लटपटे यांनी, “लावणी आणि अभंग”चा मेळ घालून अभिनयात्मक शैलीतून उपस्थितांना मनमुराद हसवले. डॉ. अविनाश खोकले यांनी ‘अभंग कविता’ विज्ञानाचा काळ थोर, पोरखेळ चमत्कार. सादर करून अंधश्रद्धेवर प्रहार केला.

या कवी संमेलनात डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. अविकुमार कासांडे, यशवंत मस्के यांनी गझल सादर केल्या. शा.भगवान गायकवाड, दुबे, कु.स्नेहा सातपुते, कु.वैभवी सातपुते संमेलनाच्या उद्घाटनाचे अध्यक्ष डॉ दीनानाथ फुलवाडकर व कवी संमेलनाचे अध्यक्ष भीमराव हटकर हे होते. सूत्र संचालन, प्रास्ताविक, संयोजन प्रा.डॉ. एम.डी.इंगोले यांनी तर आभार दुर्गानंद वाळवंटे यांनी मानले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.धूत, उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे, यांनी मार्गदर्शन केले.डॉ. हाके, डॉ. भेंडेकर, प्रा.राजेश भालेराव, शेषराव, यांनी आयोजनासाठी सहकार्य केले. केले. मेजर भालेराव, डॉ.मोहन डमरे, भूषण भूषण सावंत,डॉ पी.आर.सुर्वे, आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनेकांनी सहकार्य केले.