नूतन वर्षाच्या स्वागतासाठी काव्यमैफल व कवींचे कॅलेंडर -२०२३ चे प्रकाशन व कवी वादळकार यांच्या “ह्रदयाचे न बोलणारे ठोके” या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

33

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.29डिसेंबर):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी,पुणे ३९ वतीने नूतन वर्षाच्याञ स्वागतासाठी विशेष काव्यमैफलचे आयोजन करण्यात आलेले आहे.या काव्यमैफलमध्ये ज्या कवी कवयिञींच्या कविता कवींचे कॅलेंडर -२०२३ मध्ये समावेश आहे.त्या सर्व कवी कवयिञींना यात काव्यमैफलमध्ये सहभाग असणार आहे.या निमंंञित काव्यमैफलमध्ये कॅलेंडर मधील समावेश असलेली कविता सादर करावी.असे आवाहान करण्यात येत आहे.तेव्हा सर्व निमंञित कवी कवयिञींनी वेळवर हजर रहावे.हि काव्यमैफल ,चिंचवड,पुणे येथे संपन्न होणार आहे.कार्यक्रम वेळ दुपारी १२ ते ३ असा असेल.

*कार्यक्रम अध्यक्ष-*
*मा.श्री.दिलीप पाटील*
*(ज्येष्ठ साहित्यिक व पाठ्यपुस्तक कवी,नाशिक)*
*शुभहस्ते प्रकाशन-*
*मा.श्री.कृष्णकुमार गोयलसाहेब*
*(चेअरमन-कोहीनूर ग्रुप,पुणे)*
*प्रमुख पाहुणे-*
*मा.श्री.रामदास माने*
*(चेअरमन-माने ग्रुप आॅफ कंपनी,भोसरी)*

आपला वेळ राखीव ठेवावा.
यावेळी सर्व सहभागींना आपली *पाच कॅलेंडर* मोफत यावेळी देण्यात येणार आहे.याची सर्वांनी नोंद घ्यावी.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते कवींचे कॅलेंडर देऊन कवी कवयिञींचा सन्मान करुन गौरविण्यात येणार आहे.कवींचे कॅलेंडरचा भव्य प्रकाशन सोहळा ही आयोजित करण्यात आलेला आहे.

*प्रकाशन सोहळा व काव्यमैफल-*

*कार्यक्रम स्थळ-पैस रंगमंच,थिएटर वर्कशाॅप कंपनी,प्रीमीयर प्लाझा-२,तिसरा मजला,हस्तकला वस्ञदालनाच्या वर,पुणे मुंबई रस्ता,चिंचवड,पुणे१९*

*कार्यक्रम दिनांक-*
*रविवार दि.१ जानेवारी २०२३* *रोजी
*सकाळी ११.३० वा.ते दुपारी ३.०० वा पर्यंत*

या आगळ्या वेगळ्या नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आपण काळजीने हजर रहावे.
आपली उपस्थिती आवश्यक आहे.काव्यमंचवर आपले प्रेम आहेच.ते वाढत राहावे.

*आपला काव्यप्रेमी*
*कवी वादळकार,पुणे*
*प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे*
*संस्थापक राष्टीय अध्यक्ष*
*नक्षञाचं देणं काव्यमंच*
९६५७३४८६२२