माण तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी खंबीरपणे उभा राहणार : रामदास खोत

36

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29डिसेंबर):-माण तालुका दिव्यांग दूत नागेश खांडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींसाठी मा.डॉ. दोलताडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, म्हसवड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांचे वतीने व जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक माननीय सुभाष चव्हाण यांचे सहकार्याने म्हसवड येथे माण तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींच्या साठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी , रक्तदान शिबिर व नवीन दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन दिव्यांगांचे दैवत माननीय बच्चुभाऊ कडू साहेब यांचे स्वीय सहाय्यक तथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख मा. रामदास खोत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवशंभो सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. शंभूराजे खलाटे, माण तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ.लक्ष्मण कोडलकर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि मा. राजकुमार भुजबळ, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ मा. बाबासाहेब दोलताडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा.विलास देशमुख, नेत्ररोग तज्ञ डॉ.हेमा पिंजारी, अस्थिरोग तज्ञ डॉ.ओंकार पालवे, डॉ.वैभव जाधव, मा.डॉ.भरत काकडे, डॉ.अनिता घुटूकडे, डॉ.दीप्ती पाटील, मा.डॉ.शुभंकर देशमुख, डॉ. हरी वीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरामध्ये ४०० हून अधिक दिव्यांग बंधू भगिनी, विधवा महिला, निराधार गरजू व्यक्तींनी या शिबिराचा मोफत लाभ घेतला. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा व झेरॉक्स सेवा मोफत देण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम ऑपरेटर म्हणून सुनिल खांडेकर यांनी पाहिले. माण तालुक्यातील दुष्काळी भागात वास्तव्य करत असलेल्या बहुसंख्य गरीब दिव्यांग बंधू भगिनींना आपले दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटल ला जाण्यासाठी खर्च येतो, वाहनातून जाताना येताना दिव्यांगांचे खूप हाल होतात या दिव्यांगांच्या व्यथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माण तालुका प्रमुख, श्री.नागेश खांडेकर यांनी सातारा जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.सुभाष चव्हाण यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सिविल हॉस्पिटल सातारा चे डॉ.ओंकार पावले व डॉ.शुभम जाधव शिबिरासाठी उपलब्ध करून दिले. या शिबिराच्या माध्यमातून माण तालुक्यातील ६३ नवीन अस्थिव्यंग दिव्यांग बंधू-भगिनींना दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ मिळाला. शिबिराचे प्रास्ताविक सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे यांनी केले व त्यांनी सर्व दिव्यांग बंधू भगिनींची भोजनाची सोय केली.

मा.रामदास खोत यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष येऊन दिव्यांग बंधू-भगिनींना मार्गदर्शन केले, सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या, माण तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी माण तालुक्यातील दिव्यांगांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे अशी ग्वाही दिली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी दिव्यांगांना आपापल्या परीने मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. शिवशंभो सामाजिक व शैक्षणिक बहुद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. शंभूराजे खलाटे यांनी संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत करणार आहे अशी हमी दिली. म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि मा. राजकुमार भुजबळ यांनी दिव्यांग 2016 च्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून वेगवेगळे योजना मिळवून देणार असल्याचे सांगितले. या शिबिरासाठी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, नेत्ररोग तज्ञ डॉ.हेमा पिंजारी, अस्थिरोग तज्ञ डॉ.ओंकार पालवे, डॉ.वैभव जाधव, मा.डॉ.भरत काकडे, डॉ.अनिता घुटूकडे, डॉ.दीप्ती पाटील, मा.डॉ.शुभंकर देशमुख, यांनी मोफत सेवा दिली.

या शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींची सेवा कार्याध्यक्ष विकास खिलारी, सचिन खांडेकर, जोतीराम काटकर, प्रविण खांडेकर, सुनिल खांडेकर, ज्ञानेश्वर करचे, ऍड.अनिल सरतापे , ज्ञानदेव काळे, अमोल सदिगले, आबाजी काळे, शोभा राऊत, बाबसो जाधव, बाळासाहेब कोळेकर, तानाजी मासाळ, लक्ष्मण हुलगे, मंगल काटकर, संतोष गलांडे, किसन खांडेकर, कृष्णा खांडेकर, निलेश खांडेकर, प्रदीप खांडेकर, नितीन खांडेकर, संतोष खांडेकर, दादा खांडेकर, बापूराव खांडेकर, दवाखान्यातील सर्व आरोग्य सेविकांनी ‘दिव्यांग दूत’ म्हणून संपूर्ण शिबिर पार पाडण्यासाठी सहकार्य केले. ज्ञानेश्वर कर्चे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.