महाबळेश्वर आणि पाचगणी बनतील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे- अकोही (ACOHI ) मान्यता प्राप्त पहिले हॉटेल ठरले “बेला व्हिस्टा रिसॉर्ट”

27

🔸स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि “अतिथी देवो भव” साठी अकोहीचा पुढाकार

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.29डिसेंबर):-अकोही ( ACOHI) तर्फे आयोजित एका राष्ट्रीय पत्रकार परिषदेत आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत, विश्रांतीचे ठिकाण आणि पर्यटनासाठी विख्यात अशी महाराष्ट्रातील दोन ठिकाणे महाबळेश्वर आणि पाचगणी यांना पुढील आंतरराष्ट्रीय पर्यटनाची ठिकाणे म्हणून घोषित केले गेले.

पुण्यातील अकोही एशियाच्या राष्ट्रीय सचिवालयात ही पत्रकार परिषद पार पडली. महाबळेश्वर आणि पाचगणीला ऐतिहासिक, निसर्गाने समृद्ध आणि वसाहती युगाचा असा समृद्ध वारसा लाभला आहे तरी देखील या ठिकाणांना आजतगायत योग्य तो दर्जा मिळालेला नाही. अनेक भारतीय नैसर्गिक स्थानांच्या , वनस्पतींच्या, जीवजंतुंच्या शोधात आणि विरंगुळ्यासाठी आशियायी देशात आणि जगभरात फिरतात परंतु त्यांना महाबळेश्वर आणि पाचगणीच्या रूपात उपलब्ध असलेल्या आपल्या स्वतःच्या समृद्ध सर्वोच्च अश्या या ठिकाणांची माहितीच नसते. “आम्ही डेस्टिनेशन टुरिझम, डेस्टिनेशन वेडिंग आणि हेरिटेज टुरिझम सोबतच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन, शैक्षणिक पर्यटन आणि पुणे, मुंबई आणि कोल्हापूरच्या जवळचे क्षेत्र म्हणुन महाबळेश्वर व पाचगणी या स्थानांचे महत्व लक्षात घेऊन या क्षेत्रांचा विकास करणार आहोत.

सर्व प्रमुख आणि निवडक हॉटेल्सना आंतरराष्ट्रीय ग्राहक हाताळण्यासाठी आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थ, स्वच्छता, सुरक्षितता, पर्यटन, भाषा, शिष्टाचार, निसर्ग आणि इतर अनेक बाबींसाठी मानकांनुसार वर्गीकरण करून प्रशिक्षित आणि प्रमाणित केले जाईल. या हॉटेल्सला व या स्थानांना विविध आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, यासाठी विविध देशांचे दूतावास, आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तसेच भारतातील स्थानिक आणि राज्य पर्यटकांना महाबळेश्वर आणि पाचगणी येथे भेट देण्याची आणि राहण्याची संधी देखील दिली जाईल.

यावेळी अकोही (ACOHI) चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, “ भारताला स्वताची अनेक सुंदर समृद्ध व स्वर्गीय स्थळे लाभली आहेत . सर्व प्रकारच्या राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय ग्राहकांना हाताळण्यासाठी सर्व प्रमुख सुविधांनी सुसज्ज असलेली आमची स्वतःची पर्यटन स्थळे विकसित केली तर आपली इतर देशांत जाण्याची गरज कमी होईल.

या पर्यटन स्थळांकडे पाहता आपण फक्त त्यांचा प्रचार करण्यात, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नकाशांवर त्यांना स्थान देण्यात , राज्य व स्थानिक पर्यटनाचे विभाग व मंत्रालये आणि शहरातील सर्व हॉस्पिटॅलिटी उद्योग क्षेत्रांना हाताशी धरण्यात कमी पडतो , ते कार्य आता अकोही (ACOHI) द्वारे केले जाईल.

अकोही ४ स्टार ग्रेड लक्झरी प्रॉपर्टी म्हणून प्रमाणित झालेल्या बेला व्हिस्टा नावाच्या पहिल्या प्रॉपर्टीची मान्यता आणि प्रमाणन जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांनी सर्व आवश्यक निकष पूर्ण केले असुन त्यांनी प्रीमियम विभागात ग्रेडिंग आणि मान्यता मिळवली आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्र असो किंवा सरकारी एजन्सींची विश्वासहर्ता, समानता, ग्राहकांसाठी सुरक्षित वातावरण, गुन्हेगारीवर नियंत्रण, सुरक्षितता या सर्वांसाठी ही मान्यता आणि अकोही प्रोटोकॉलद्वारे मिळणारी सुरक्षा महाबळेश्वर आणि पाचगणी येथील सर्व ब्रँड आणि प्रॉपर्टीसाठी महत्वाची ठरेल, असे डॉ. सानी अवसरमल यांनी पुढे सांगितले.

यावेळी बेला व्हिस्टाचे सीईओ रमेश गौड म्हणाले, बेला व्हिस्टा या सेगमेंटमध्ये प्रथम असल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो , गेल्या अनेक वर्षांपासुन आमच्या संपुर्ण कर्मचारी आणि व्‍यवस्‍थापनाने घेतलेले हे कठोर परिश्रम आहेत. आम्ही आमच्या सर्व अतीथींची सर्वोत्‍तम सेवा करून आणि त्यांना लक्झरी सुविधा मिळतील याची खात्री करण्‍यात नेहमीच मोलाची भूमिका बजावतो.

आम्ही ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ, चांगला स्टे, व्हॅल्यु ऑफ मनी, स्वच्छता, सुरक्षितता, सुंदर नैसर्गिक वातावरणचा आनंद मिळेल या गोष्टींची पूरेपुर काळजी घेतली आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थानी येऊ इच्छुनार्यांच्या सर्व सुविधा आणि गरजांसाठी आम्ही नेहमिच तत्पर असतो.

निसर्गाच्या मध्यभागी वसलेल्या बेला व्हिस्टाचे लोकेशन पाहता त्यास स्वर्गीय स्थान म्हणने वावगे ठरणार नाही. मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हे हॉटेल इतर सर्व हॉटेल्सला मात देते.

स्वच्छता सुरक्षिततेसोबतच येथे विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि अकोहीच्या सुरक्षा मानकांचा होणारा अवलंब पाहता हे हॉटेल ग्राहकांसाठी सर्वच बाबतीत सर्वोच्च आहे.

“पुढे रमेश गौड म्हणाले, आम्ही येत्या काही दिवसांत अकोही द्वारे होणार्‍या कार्यक्रमासाठी स्वतःला तयार करत आहोत जिथे भारताच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील दिग्गजांसह विविध देशांच्या कौन्सुलेट जनरल्स ते बॉलीवूडचे सितारे आणि विविध राज्यांचे सरकारी अधिकारी बेला विस्टाला भेट देणार आहेत. जेथे महाबळेश्वर आणि पाचगणीला आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थान ठरवण्याच्या बहुप्रतिक्षित घोषणेवर शिक्कामोर्तब करण्यात येईल” .
याबाबत अधिक माहितीसाठी, चौकशीसाठी संपर्क करा-  inquiries.asia-division@acohi.org