चिमुर तालूक्यात वनविभागाच्या आर्शिवादाने अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू

60

✒️विशेष प्रतिनिधी(उपक्षम रामटेके)

चिमुर(दि.30डिसेंबर):- तालूक्यात चिमुर व तळोधी रेंज च्या वनविभाग मध्ये अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असुन सुध्दा वनविभाग दुर्लक्ष करीत आहे.

नेरी, शंकरपुर, भिसी, (बोडधा, हेटी, कोटगाव, पिंपळगाव, मेटेपार, मांगलगाव, शिवरा, सिरसपुर, डोमा या परीसरात सागवान व आळजात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ठेकेदार मागील दोन-तीन वर्षा पासुन वनविभागाची परवानगी न घेता आळजाती वृक्षतोड करीत आहे. शेत शिवार व नदी पात्रा वर चे शेकडो वृक्षतोड ठेकेदारानी केली आहे.

दिवसा व रात्रोला क्रेन द्वारे लाकूड ट्रक मध्ये भरून नागपुर कडे नेण्यात येत आहे. अश्या प्रकारे अवैध वृक्षतोड कडे वनविभागाने लक्ष दिले नाही तर काही दिवसात नदी पात्र व शेतशिवारात वृक्ष दिसणार नाही. ठेकेदार इतकी हिम्मत कुणामुळे करीत आहे याबाबत चौकशी मा.वनमंत्री कडून होण्याची गरज आहे. ठेकेदार व वनविभाग मध्ये काही अर्थपूर्ण संबंध तर नाही ना..? याबाबत चौकशी होणे गरजे चे आहे. अशी मागणी जोर धरत आहे.