ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेली कामे यशस्वी होतात – ज्ञानेश्वर राक्षे

30

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.1जानेवारी):-विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासात शिक्षकांची व पालकांची भूमिका महत्वाची आहे. मुले संस्कारक्षम असतात, चांगले संस्कार होण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी जागरूक असायला हवे, ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेली कामच ही यशस्वी होत असतात, ध्येय हीन माणसे कधीच यशस्वी होत नसतात ही तितकीच वस्तुस्थिती आहे. ज्ञानोबाराय आम्ही कीर्तनात ऐकतो, तुकोबाराय आम्हाला फक्त कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. पण ज्ञानोबाराय, तुकोबारायांचे चरित्र जो पर्यंत आमच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजत नाही, तोपर्यंत आमचा विद्यार्थी सक्षमपणे यशस्वी जीवन जगू शकत नाही.

शाळेतल्या उत्तरपत्रिकेला आलेली गुणांची सुझ त्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असलेले जे गुण आहेत त्या गुणांना तुम्ही जास्त किंमत द्या. परीक्षेमध्ये मिळालेले गुण हे महत्वाचे आहेतच पण विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात आवड आहे हे सुध्दा तितकेच पाहणे गरजेचे आहे. स्वतचे काम करत असताना कर्तुत्वावर जर माणसाचा विश्वास असेल तर माणूस जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, असे प्रतिपादन युवा व्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर राक्षे यांनी तलवाडा येथे थोरात कोचिंग क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात केले. यावेळी कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुशराव थोरात ( अंकल ) यांनी पाल्यांची शाळेत व शाळेबाहेर काळजी कशी घ्यावी तसेच त्यांच्यावर संस्कार कसे करावेत? यावर प्रकाश टाकण्यासाठी पालक मेळावा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. डोरले सर यांचे ही मार्गदर्शन लाभले.

यावेळी बोलताना डोरले सर म्हणाले की, मुलांना घडवण्यासाठी शिक्षकांना गुणवत्ता द्यावी लागते. त्याग केल्याशिवाय जगात फुकट काही मिळत नाही. विद्यार्थ्यांच्या पाठीवर गुरूंचा हात असल्याशिवाय प्रगती होत नाही. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून केंद्रप्रमुख जगदीश मरकड, प्रमोद डोंगरे सर, सचिन डोंगरे सर, पत्रकार आतिख शेख, बाळासाहेब शिंनगारे, विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप गणेश कचरे महाराज यांनी तर आभार अंकुशराव थोरात यांनी मानले.