सामाजिक बांधिलकी जपत युवकांनी केले नवीन वर्षाचे स्वागत

29

🔸नेहरू युवा केंद्र, शिवकल्याण संस्था आणि इतर सामाजिक संस्थांचा पुढाकार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.2जानेवारी):-नवीन वर्षाची सुरुवात म्हटला की मोठ्या- मोठ्या पार्ट्या, नाच गाणे, स्नेहभोजनचे आयोजन केल्या जाते. मात्र समाजातील अजूनही बराचसा घटक आहे यांच्याकडे वर्षभरात कोणताही सण उत्सव असला तरी कोणीही लक्ष देत नाही किंबहुना ते घटक नेहमीच दुर्लक्षित असतात हीच गोष्ट लक्षात घेऊन नवीन वर्षाची सुरुवात म्हणून, सामाजिक बांधिलकी ठेवून नवीन वर्षाच्या स्वागताकरिता कुठलाही व्यर्थ खर्च न करता नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, स्वयं रक्तदाता समिती आणि इतर सामाजिक संस्थाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली व अपंग विद्यालय लांजेडा येथे अपंग विद्यार्थ्यांना व वृद्धांना खाऊचे वाटप करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे, सहसचिव संतोषी सूत्रपवार, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष राहुल भांडेकर, स्वयम रक्तदाता समिती उपाध्यक्ष निशिकांत नैताम, ग्रामसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सोनपिपरे, सामाजिक कार्यकर्ते अजय सोमणकर, सुशील भांडेकर, आकाश सोनटक्के, विकेश दुधबळे, भूषण कुनघाडकर, मयूर गावतुरे, रोशन कोहळे, शिवानी मोहूर्ले, जितेश शेट्टीवार, अविनाश आचला, अमित सुरजागडे, शुभम किरमे उपस्थित होते.

उपस्थित सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवकांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी व अपंग विद्यालयातील चिमुकल्याशी हितगुज केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीचे काही क्षण तिथे घालविले त्यामुळे सर्वांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका सामाजिक कार्यातून व जबाबदारीतून झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.