सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा विचार स्रीयांच्या मनात खोलवर रूजवणे गरजेचे – युवा व्याख्याते लक्ष्मण जाधव

32

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.4जानेवारी):-“जेव्हा समाजामध्ये स्त्री एक भोगवादी वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन होता. स्त्रीयांसाठी शिक्षणाचे सर्व मार्ग बंद होते. तेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवुन त्यांना सामाजिक प्रवाहात आणले. स्त्रियांचा आवाज बनून त्यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई स्त्रियांच्या कैवारी होत स्त्रीमुक्तीच्या शिल्पकार ठरल्या,” असे मत युवा व्याख्याते लक्ष्मण जाधव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे मनपाच्या लाल बहादूर शास्त्री शाळेत ‘स्त्री मुक्तीच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले’ या विषयावर लक्ष्मण जाधव यांचे व्याख्यान झाले यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक सादिक आतार,शिक्षक राजेंद्र ताथवडे,गजानन निळे, शिक्षिका विणा कुंभार,विजया वाव्हळ,रुपाली पिसे,साधना मनकर, लक्ष्मी करवंदे उपस्थित होत्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थीनींना पेन वाटप करण्यात आले.
लक्ष्मण जाधव म्हणाले “सामाजिक परिवर्तन महात्मा ज्योतिबा फुले यांचे ध्येय होते. त्यांचे हे ध्येय सावित्रीबाई फुले यांनी सत्यात आणले. शिक्षणाने परिवर्तन होते, हे त्यांनी जाणले आणि त्या जोतीबा फुले यांच्या सावली नाही, तर खांद्याला खांदा देऊन कार्य केले या सामाजिक योगदानाने स्त्री सामाजिक जिवनाचे चित्र बदलून गेले. स्त्री शिक्षण, बालहत्या, सतीप्रथा प्रतिबंध करण्यासह दुष्काळ भागात अन्नछत्र अशी विविध काम केली.

सावित्रीबाई खंबीर मनाच्या होत्या. कोणावरही अवलंबून न राहता त्या अनुभवातून घडल्या. समाजातील विरोध झुगारून बंडाचे निशान त्यांनी हाती घेत स्त्री मुक्तीसाठी मोठे योगदान दिले.” मात्र सध्याच्या परिस्थिती मध्ये मुली शिक्षणापासून वंचित राहात आहेत सन्मानाचे जिवन जगण्यासाठी सावित्रीच्या लेकींच्या मनाला सावित्रीबाई चे शिक्षणाचा विचार रुजने गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेतील शिक्षिका रुपाली पिसे यांनी केले.