जि.प.शाळा थोरगव्हाण येथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

36

✒️यावल प्रतिनिधी(निलेश धर्मराज पाटील सर)

यावल(दि.4जानेवारी);-यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धर्मराज पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव होते. शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांनी प्रतिमा पुजन करून माईंच्या कार्याला शतशःनमन केले. सावित्रीमातेचे कार्य व शिक्षणाचे महत्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांनी विद्यार्थ्याना पटवून दिले.

शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री माता
आज जगाची शिलेदार .शालेय विद्यार्थीनी सावित्री माईंची वेशभुषा करून त्याच्या छटा व कार्य आपल्या शब्दात सांगतीले.

याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवणे, सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवणे, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, माता पालक गटातील सर्व महिला मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश पाटील यांनी मानले.