माणच्या पत्रकारांमुळे अपघातग्रस्ताला मिळाले जीवदान

73

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5जानेवारी):- माण तालुक्यातील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे अपघातग्रस्त युवकाला जीवदान मिळाल्याची घटना बुधवार दि. ४ जानेवारी रोजी रात्री घडलीय. उकिर्डे घाटात मोहसीन महंमद सय्यद (रा. पिंपोडे खुर्द ता.कोरेगाव) हा युवक दुचाकी क्रमांक (MH 11 AZ 2275) वरून दहिवडी येथे पाहुण्यांकडे निघाला होता. त्यावेळी वाहनावरील ताबा सुटून अपघातग्रस्त झाला. या आवाजाने उकीर्डे येथील कांबळे वस्तीवरील लोकांनी घटनासाठी धाव घेतली.

त्याचवेळी साताऱ्याकडून निघालेल्या माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मंगरुळे, सचिव बापूसाहेब मिसाळ, माजी अध्यक्ष संदीप जठार, फिरोज तांबोळी व धनंजय पानसांडे यांना अपघातग्रस्त वाहन दिसताच थांबले. दुचाकी जवळच खड्डयात रक्तबंबाळ होऊन पडलेल्या श्री मोहसीन सय्यद दिसले. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेतून खड्डयातून बाहेर काढून तात्काळ १०८ ला फोन करून ऍम्ब्युलन्स बोलवली. त्याचबरोबर दहिवडी पोलीस स्टेशन , पोलीस पाटील जितेंद्र कांबळे व जखमीच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली. मोहसीन सय्यद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंधरा मिनिटातच ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्यावर श्री मोहसीन सय्यद यांना पुढील उपचारासाठी साताऱ्याकडे पाठविण्यात आले.

माण तालुक्यातील पत्रकारांच्या सतर्कतेमुळे जखमी मोहसीन सय्यद यांना लवकर उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उकिर्डेचे पोलीस पाटील जितेंद्र कांबळे यांनीही मदत केली.