पदमश्री महाकवी नामदेव ढसाळ यांना अभिवादन

27

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.16जानेवारी):-पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त ताडीवाला रोड येथे पंचशील चौकात पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन दलित पॅंथर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवे यांनी केले होते .या कार्यक्रमास विभागातील माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड विधान परिषदेचे माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड उपस्थित होते.

त्याचप्रमाणे युवक अध्यक्ष विक्रम कांबळे, राजेश गाय गवळी, विठ्ठल केदारी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विभागातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी आमदार अॅड.जयदेव गायकवाड यांनी सांगितले की,” दलित पॅंथर या संघटनेची पुन्हा आवश्यकता आहे .कारण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दलितांवर होणारे अन्याय वाढत चालले आहे .या अन्यायास फक्त पॅंथरच प्रतिकार करू शकतो ” शहराध्यक्ष प्रकाश साळवे, विठठल केदारी, यांनी संयोजन केले आहे.