नेत्र रोग तज्ञ डॉ. रामचंद्र राठोड यांचा गोर बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित

97

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
___________________________
पुसद(दि.16जानेवारी):-येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर रामचंद्र राठोड यांना नुकतेच राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या अगोदर सुद्धा त्यांनी केलेल्या समाज कार्यामुळे त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉक्टर रामचंद्र राठोड हे 2007 पासून पुसद येथे नेत्ररोग तज्ञ म्हणून हॉस्पिटल चालवितात, त्याच बरोबर त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब समाजाची सेवा करण्याच्या उद्देशाने 350 पेक्षा अधिक शिबिरे घेऊन अतिशय दुर्गम भागातील व गरीब, वृद्ध लोकांची शिबिराद्वारे तपासण्या करून त्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर त्यांना चष्मे उपलब्ध करून दिले व विनामूल्य नेत्र तपासणी करून त्यांसाठी लागणारे डोळ्यांमध्ये टाकावयाचे आय ड्रॉप्स विनामूल्य वाटप केलेले आहेत.

या साडेतीनशेच्या वर शिबिरांतुन 60 ते 70 हजार लोकांची तपासणी करून त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वेळप्रसंगी नेत्र सर्जरी ऑपरेशन्स अनेक रुग्णाचे विनामूल्य केलेले आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन आदर्श नेतृत्व रोग तज्ञ महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार 2022 ने सन्मानित. त्यानंतर सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार 2022 व आता नुकताच मिळालेला धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा विकास फेडरेशन कर्नाटक यांच्याकडून धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्कार 2023 ने सन्मानित. व विविध प्रकारचे आदर्श पुरस्कार प्राप्त डॉक्टर रामचंद्र राठोड हे मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणी प्रमाणे अशी दूरदृष्टीचे नेत्ररोग तज्ञ असुन अतिशय कमी वयामध्ये समाजाबद्दल असलेली आपुलकी अशा दूरदृष्टी असलेल्या डॉक्टर रामचंद्र राठोड यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

आज पुसद येथे तुळजाई ग्रीन किचन हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केलेल्या सर्व जीवनपटाचा आढावा या ठिकाणी मांडला व उद्गम फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा सौ. अनिताताई मनोहरराव नाईक यांनी डॉक्टर रामचंद्र राठोड व देवीता रामचंद्र राठोड यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनिताताई काकू यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय मनमिळावू व समाज कार्यामध्ये धडपडत राहणारे असे डॉक्टर म्हणून डॉक्टर रामचंद्र राठोड हे सर्व दूर परिचित आहेत असे त्यांनी मनोगत व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीस वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व यामध्ये सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते व उद्गम फाउंडेशनचे सुनील भाऊ गुद्दटवार व पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करतांना डॉक्टर रामचंद्र राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना मी समाजकार्याची प्रेरणा उदगम फाउंडेशन व नाईक कुटुंबाकडूनच घेतल्यामुळे मी समाजकार्य करू शकलो अशी त्यांनी पुरस्काराची माहिती देताना मनोगत व्यक्त केले माझी जि प उपाध्यक्ष ययाती भाऊ मनोहर नाईक यांच्यामुळेच मी समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकलो असे सुद्धा त्यांनी मत व्यक्त केले व पोहरादेवी येथे पुरस्कार स्वीकारताना बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीला एक भव्य दिव्य असे शासनाकडून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उभारण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे.

त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान केले पाहिजे असे डॉक्टर रामचंद्र राठोड यांनी सांगितले व ऊस तोडी साठी जाणाऱ्या ऊसतोड कामगारांनी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे त्याचबरोबर ऊसतोड ठेकेदारांनी व कारखान्यांनी मजुरांना चष्मे देऊनच कामगारांना ऊस तोडावयास पाठवावे. कारण ऊस तोडत असतांना ऊस तोड कामगारांच्या डोळ्यांना उसाचा पाचोळा लागून अनेकांचे डोळे खराब झालेले आहेत. यापुढे कोणाचेही डोळे खराब होणार नाहीत याची खबरदारी म्हणून सर्वांना चष्मे देऊनच ऊसतोड करून घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील महिला चश्मा वापरण्यासाठी टाळाटाळ करतात त्यांनी चश्मा वापरून दृष्टि टिकवून ठेवावी व नेत्रदान बदल समाजामध्ये जनजागृती आपल्या मार्फत झाली पाहिजे असे मत व्यक्त केले