डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे आरोग्य तपासणी शिबीर २० जानेवारीला आयोजित-शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे आयोजन

29

✒️शशांक चौधरी(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी)

धामणगाव(दि.16जानेवारी):- शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने, दिनांक २० ते २३ जानेवारीच्या दरम्यान “माझं गाव माझा उत्सव “ – २०२३ कुऱ्हा महोत्सवात दि. २० जानेवारीला दुपारी २ वाजता डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टर्स होणार सहभागी होतील .

स्व. तीर्था राजेश टेकाडे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या शिबिरात फिजिशियन डॉ .मानसी काविमंडन, सर्जन डॉ. श्याम भगत, स्त्री व प्रसूती रोग तज्ञ डॉ.तनया देशमुख, दंतरोग तज्ञ डॉ. सौमित्र देशपांडे आणि कान, नाक, घसा तज्ञ डॉ. रवी गणेशकर सहभागी होतील.

दि. २० ते २३ दरम्यान ग्रंथदिंडी, उद्घाटन, आरोग्य तपासणी शिबीर, ग्रंथ प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला मेळावा, हळदी कुंकू, उखाणे स्पर्धा, व्याख्यान, सामान्य ज्ञान स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा, सन्मान कर्तृत्वाचा, रांगोळी स्पर्धा, डीश डेकोरेशन स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, एकता मॅरेथॉन, शरीर सौष्ठव स्पर्धा, रस्सी खेच स्पर्धा, विविध खेळ स्पर्धा, कवि संमेलन, बक्षीस समारंभ असे भरगच्च कार्यक्रम ३ दिवस होणार आहेत.आरोग्य तपासणी व अन्य विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.