सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंचितच्या शाखेचे उद्घाटन

29

🔹बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी कार्यकर्ते बना- बुद्धरत्न भालेराव

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.16जानेवारी):- पांढूर्णा केदारलिंग येथे दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी यवतमाळ- हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पांढूर्णा केदारलिंग येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेची स्थापना करण्यात आली.

दिनांक १५जानेवारी २०२३रोजी सम्यक आंदोलनाचे नेते तथा बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र बहुजनांचे युवराज सुजात आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यातील पांढूर्णा केदारलिंग येथे ग्रामीण भागातील उत्साह बघून या शुभ दिनी वंचित बहुजन आघाडी शाखा पांढूर्णा
केदारलिंग येथे शाखेच्या फलकाचे तालुक्याचे युवा तालुकाध्यक्ष बुद्ररत्न भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वप्रथम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, क्रांतीबा ज्योतिबा फुले, या महापुरुषांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्ध रत्न भालेराव म्हणून भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव रिपब्लिकन वार्तान्यूज चैनल चे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले दिलीप टाळीकोठे, मिलिंद पठाडे इत्यादी प्रमुख पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन झाले यामध्ये बोलताना राजेश ढोले म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा नुसता पक्ष नसून बहुजनांना घेऊन चालणारा सर्व समाज वंचितांना न्याय देणारा असा चळवळीतून उभा राहिलेला सर्व समावेशक पक्ष आहे.अन्यायला वाचा फोडण्यासाठी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो वंचित आघाडी त्यांना न्याय देण्यासाठी तेवढ्याच तत्परतेने पुढे येते सर्वसामान्य बहुजनांच्या समस्याला सतत वाचा फोडताना वंचित आघाडीचे कार्य दिसते असे वंचित च्या विचार पिठावरून यांनी बोलताना.

आठरा आलुतेदार आणि बलुतेदार तसेच समस्त बहुजन वर्गाला घेऊन न्याय देण्यासाठी या पक्षाचे सर्वेसर्वा श्रद्धेय् बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचे हाच मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील व्हा असे आवाहन करित समस्त वंचितांना सत्तेमध्ये जाण्यासाठी एकमेव बहुजनांचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी होय यासाठीच बाळासाहेबांचे पक्षाच्या विचाराचे स्वाभिमानी कार्यकर्ते बना असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी ग्रामीण भागातील जनतेला केले त्यांना ऐकताना ग्रामीण भागातील नागरिक मतदार वर्ग मोठ्या हस्तेने ऐकत होता .

या कार्यक्रमाला प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, रिपब्लिकन वार्ता विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, दिलीप ताळीकोटे, मिलिंद पठाडे, शरद खंदारे, बाबुराव वाढवे , कैलास धबाले ,आनंदा वाढवे, मारोती वाढवे ,सतीश गडदे, देवानंद इंगोले, भगवान इंगोले, भिमराव धबाले, तुकाराम धवसे, ताराचंद वाढवे ,गिरजाबाई वाढवे ,केवळाबाई हटकर ,मालाबाई इंगोले ,रेखा धबाले, सुनिता धबाले इत्यादी प्रमुख कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यासह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.