मित्र नाट्य कला मंडळ विरखंडी यांच्या सौजन्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

71

✒️कुही(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कुही(दि.1)- मित्र नाट्य कला मंडळ विरखंडी यांच्या सौजन्याने स्व. आमदार वसंतराव ईटकेलवार लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत भीमराव तुळशीराम लोखंडे यांना व्हील चेअर स्वरूपात मदत करण्यात आली.

यावेळी NMMS शिक्षवृत्ती परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी नवेली राहुल लोखंडे, डिंपल अनिल लोखंडे,अदिती अविनाश लोखंडे, 12 वि मध्ये गावातून प्रथम सूरज विनोद पडोळे,द्वितीय मयुरी गुरुदास चाफले,
तृतीय अभिजित रणभिड भोयर तसेच10 वि मध्ये गावातून प्रथम श्रुती सुरेश लोखंडे, द्वितीय सावन कैलास कस्तुरे,तृतीय अंशुल गुंडेराव शेंडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल,श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी मा.श्री.संदीपभाऊ ईटकेलावर बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामिण तथा विश्वस्त नागपूर सुधार प्रन्यास, सचिन पुडके महाराज (तालुका प्रमुख कुही तालुका) डॉ. आनंदजी खडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रदीपजी घुमडवार ( अध्यक्ष नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ ), सज्जनजी पाटील, प्राध्यापक बालाजी पाटील हाईस्कुल, अंकुशभाऊ येळने, विलास कावडे सद्यस ग्रा.पं. वग, विकास वाघमारे, राजू निंबर्ते राजेंद्र लांजेवार, भोला खवास.हर्षल देशमुख इत्यादी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मित्र नाट्य कला मंडळ विरखंडी अध्यक्ष दिनेश पडोळे, उपाध्यक्ष आकाश वासनिक, सचिव महेश पडोळे व सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावकरी व नाट्य प्रेमी प्रेक्षक मंडळी उपस्थित हॊते.