नविन शैक्षणिक धोरण रोजगाराभिमुख? या विषयावर वादविवाद स्पर्धा

44

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.19जानेवारी):-स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे विद्यार्थी कल्याण विभाग व सांस्कतिक विभागाच्या वतीने वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. नविन शैक्षणिक धोरण रोजगाराभिमुख आहे किंवा नाही या विषयावर वादविवाद स्पर्धा संप्पन झाली. या स्पर्धेचे अध्यक्ष मराठी विभागप्रमुख प्रा. कार्तिक पाटील होते. परिक्षक म्हणून प्रा डॉ. कत्रोजवार, प्रा निखिल पिसे होते.

कार्यकमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. गजभिये, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा पितांबर पिसे,रासेयो कार्यकमाधिकारी, प्रा. प्रफुल राजुरवाडे विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. डॉ राहांगडाले, प्रा. डॉ कामडी तसेच प्रा शितल वानखेडे, प्रा वर्षा सोनटक्के, प्रा वाकडे, प्रा. चौधरी परिश्रम घेतले. कार्यकमाचे प्रास्ताविक प्रा.आशुतोष पोपटें यांनी केले. प्रसंगी स्पर्धत बहुसंख्य विद्यार्थी सहभागी होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल बन्सोड यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम यशस्वीपणे संप्पन झाला