गुट्टे प्रतिष्ठान कबड्डी संघाची कर्नाटकात बाजी, सुमन चव्हाण ठरली बेस्ट रेडर

32

🔹कानडी कौतुकाने भारावले खेळाडू : आ.डॉ.गुट्टेंच्या हस्ते सत्कार

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जानेवारी):-कर्नाटकच्या बेळगाव मधील गुलगंजीकोप्पा येथे श्री.इरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित इंटर स्टेट वूमन ओपन कबड्डी स्पर्धेत मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या कबड्डी मुलींच्या संघाने बाजी मारत द्वितीय स्थान पटकावले आहे. तसेच संघातील खेळाडू सुमन चव्हाण हिस बेस्ट रेडरचा बहुमान मिळाला आहे.

हि स्पर्धा दि.७ व ८ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली असून अंतिम सामना गंगाखेड विरुद्ध हरियाणा असा रंगला होता. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात फक्त ४ गुणांनी दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान संघाचा निसटता पराभव झाला. त्यामुळे संघ उपविजेता ठरला आहे.

नियोजनबध्द खेळ, संयमी प्रदर्शन, सामूहिक खेळी, आक्रमक चढाई अशा विविध गुणांमुळे दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या संघाने कानडी प्रेक्षकांची मने जिंकली होती. म्हणून कानडी प्रेक्षकांनीही खेळाडूंची आपुलकीने विचारपूस करुन भरघोस पाहुणचार केला. त्यामुळे संघातील खेळाडू सुध्दा भारावले होते.

प्रतिष्ठानच्या संघात निकिता लंगोटे, शकुंतला बडे, कावेरी आडे, सोनाली पोले, पुजा राठोड, सुमन चव्हाण, कोमल लगोटे, संध्या पवार, श्रेया डाकवे यांचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून कबड्डी तज्ञ राजेश राठोड यांनी काम पाहिले.

दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या संघाने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल संघाचे मुख्य आधारस्तंभ आणि गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी खेळाडूंचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.

दरम्यान संघाच्या यशाबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंडे, सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर, उपाध्यक्ष शिवाजी पवार, सदस्य कवी विठ्ठल सातपुते, हनुमंत लटपटे, राजेभाऊ सातपुते, सचिन महाजन आणि संभुदेव मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल सातपुते यांनी केले. तर आभार प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासप शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, माणिक नागरगोजे, विलास राठोड, राजेश राठोड, भास्कर ठवरे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते