नेता,नोकरांची मुजोरी आणि नागरिकांची कमजोरी.

46

लोकशाहीत जे आधिकार आहेत,ते पुरेसे आहेत.शासन,प्रशासन सुद्धा पुरेसे आहे.लोकांना माहीत आहे.कळते पण वळत नाही.कारण नेता व नोकरांना अतिरिक्त संरक्षण दिले आहे.तेच चुकीचे आहे.आयपीसी आणि सीआरपीसी मधे मी मांडलेले आहे.कोणताही नागरिक सरकारी काम करून घेण्यासाठी अर्ज करतो.फी भरतो.त्याचेकडून सर्वच माहिती घेतली जाते.सर्वच ठिकाणी सही अंगठा घेतला जातो.काही ठिकाणी तर कोरा अर्जावर सुद्धा सही अंगठा घेतात.खरेदी रजिस्टर झाल्यानंतर ९।१२ वर नेहमीच कोरा अर्जावर सही घेतात.बॅंकेचे कर्जाच्या अर्जावर सुद्धा कोरा ठेवून सही घेतली जाते.विमा एजंट सुद्धा असेच करतो.तुम्ही येथे येथे सही करा.आम्ही भरून घेऊ.तलाठी ,मैनेजर, एजंट कितीही प्रामाणिक असला तरी हे चुकीचे आहेच.येथे फसवणूक झाली अथवा न झाली तरीही ते चुकीचे आहेच.आणि होतेच.

शेतकरी कापूस सुद्धा उधार देतो.चुकीचे आहे.मुर्खपणा आहे.शंभर दोनशे रूपये भाव जास्त दिला तर उधार द्यायचा का? मुळीच नाही.तो बेपारी भाऊबंद, नातेवाईक असला तरीही तो केंव्हा पळून जाईल याचा नेम नसतो.भडगांव पाचोरा तालुक्यातील शेतकरी असेच लोभाने व्यापारी ला उधार कापूस विकतात.पावती सुद्धा घेत नाहीत.आणि तो पळून गेला कि, पोलिस , पुढारी कडे मदत मागतात.हे चुकीचे आहे.हे मुर्खपणाचे आहे.कितीही आर्थिक अडचण असली म्हणून असे करणे चांगले नाही. रावेर,यावल ,चोपडा कडील शेतकरी उधार केळी देतात.फसवणुक झाली कि तोंड ठोकतात.

नागरिक पोलिसात, कोर्टात अर्ज करतो.त्याला पोहच मिळत नाही.पण त्याला नोटीस दिली तर सही घेतात.ज्यावर सही केली तो कागद तरी दिला पाहिजे.कधी कधी तो सुद्धा देत नाहीत.हे चुकीचे आहे.येथेच बदमाषी आहे.आणि पोलिस आणि न्यायाधीश असे करीत असतील तर हेच खरे चुकीचे आहे.फसवणुक आहे.पोलिस आणि कोर्ट ही नागरिकांच्या शोषणाची,छळाची केंद्र आहेत.इंग्रजांनी भारतीयांवर दहशत निर्माण करण्यासाठी.नागरिक साहेबांना हात जोडून, वाकून नमस्कार करतो.पण साहेब साधा नमस्कार काय हात सुद्धा वर करीत नाही.हूं सुद्धा म्हणत नाही.यातच नोकरीचा,पदाचा,खुर्चीचा अहंभाव ठासून भरलेला आहे.टाचणी मारून छातीत भरलेली हवा काढली पाहिजे. प्रामाणिक, पारदर्शक शासन,प्रशासनासाठी.

या नोकरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही निवडून दिलेल्या आमदार खासदार मधून मंत्री बनतात.ते त्या त्या खात्याचे प्रमुख असतात.आमचा आमदार म्हणजे साहेबाचा प्रमुख.पण मंत्री सुद्धा पदाचा गर्व करतात.मतदारांची तक्रारी कडे लक्ष देत नाहीत.मंत्रीला वसुली करून देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी कडे जास्त लक्ष देतात.जळगांव झेडपीत भ्रष्टाचार विरोधात आम्ही पालकमंत्री खडसेंकडे तक्रार केली होती.तीनवेळा.पीए पकडून सही घेतली.तरीही खडसे दाद देईना.म्हणून त्यांच्या अंगणात जाऊन ठाण मांडून बसलो.येथील केंव्हातरी.भेटतील आपल्याला.पण खडसे भेटलेच नाहीत.उलट आम्हाला मारायला गुंड आलेत.त्यांनी आम्हाला पोलिसात जमा केले.फिर्याद,खटला.चार वर्षे.पण एकाही पोलिसांनी लिहीले नाही कि,हे तेथे का गेले होते? जर रेती माफिया,हप्तेखोर खडसेंच्या घरादारात मुक्त संचार करीत होते तर आम्ही तक्रार करणारे नागरिक का नाही?पण ही नैतिकता पोलिसांना शिकवली जात नाही.पोलिसांचा गृहमंत्री सव्वा वर्ष जेलमधे होता.खडसे जाता जाता राहिले .

आता गिरीश महाजन ग्रामविकासमंत्री आहेत.मला आनंद वाटला.आता आपलाच माणूस,आपलाच आमदार मंत्री आहे तर आपण झेडपी सीईओ च्या भ्रष्टाचार विरोधात तक्रार केली तर गिरीश महाजन दखल घेतील.कसले काय? गिरीश महाजन उलट झेडपीच्या चोरांचे मुखीया बनले आहेत.जसे दाऊद, गवळी,राजन होते.सरकारी नोकर भ्रष्टाचारी आहेत.चोर आहेत.हे मी सांगायची गरज नाही.पण आमचा आमदार,आमचा मंत्री सुद्धा भ्रष्टाचारी आहे,चोर आहे,हप्तेखोर आहे,हे मी सांगतो.मी सिद्ध करतो.कोणाला हे माहीत नाही, कळत नाही त्यांना मी आवाहन देतो.

पालकमंत्री गुलाबराव पाटील.भगवा सदरा.टिळा माळा .सगळे काही दिसते.पण ते प्रामाणिक नाहीतच.त्यांच्या ख प च सवयींवर आम्ही बोलत नाहीत.आसाराम बापू सुद्धा स्वताला सांभाळू शकले नाहीत.यांच्यात तो संयम नाही. जेथे कमीशन मिळत नाही,तेथे रस्ते बनवत नाहीत.हेच गुलाबराव कोरोना काळात औषधी आणि वैद्यकीय यंत्रसामग्री चा निधी लुटून धड झालेत.आणि जिल्ह्यातील बाया माणसे औषध व प्राणवायू वाचून तडफडून मेलेत. आमचा आमदार, आमचा मंत्री जर भ्रष्टाचारी नोकरांना हाताशी धरून आमचाच जीव घेत असेल तर ,लायक समजायचा कि लायक? आणि हेच गुलाबराव प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वज फडकवणार आहेत.कसे टिकेल ध्वजाचे पावित्र्य?जळगाव मधील रस्ते दहा वर्षे बनले नाहीत.आता महानगरपालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली म्हणून थातूरमातूर बनवत आहेत.कोणत्याही नियमांचे पालन नाही.इस्टीमेट लिहीले तितका बनवत नाहीत.कितीचा, कुठपर्यंत,कोण बनवतो,ते सुद्धा जाहीर करीत नाहीत.आमदार , नगरसेवक प्रामाणिक नाहीत.एकही बोलत नाहीत.एक हायवेच्या काठावर दारू विकतो तर दुसरा शहरातील भुखंड लाटतो.कलेक्टर साहेब फिरतात,पण पाहिजे तेथे नाही.म्हणे देखरेख समिती बनवू.कोणाची?चोर संघटनेची?चोर पक्षाची? जशी डीपीडीसी चालते.दोन चार बिनधास्त माणसे का घेत नाहीत?काय हेतू आहे?

नागरिकांनी आता विचार केला पाहिजे.कि ही लोकशाही,हे प्रशासन,हे शासन आहे नेमके कोणासाठी? सरकारी नोकरांसाठी ,मंत्र्यांसाठी कि आम्ही करदाता नागरिकांसाठी ? असा प्रश्न पडला पाहिजे.कदाचित लोकांना प्रश्न पडतो पण हिंमत होत नाही.नोकर, पोलिस,कोर्ट यांचे भय आहे.हे भय कमी केले पाहिजे.महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण आणि आण्णा हजारे यांनी हे भय काढून भिरकावून दिले होते.म्हणून चोरांवर वचक बसला.आम्ही जळगाव जागृत जनमंच, महाराष्ट्र जागृत जनमंच त्याच दिशेने काम करीत आहोत.जर कुठे भ्रष्टाचार झाला,चोरी झाली,लांचखोरी झाली तर बोला.एकाचे धाडस होत नसेल तर एकत्र येऊन बोला.तरीही धाडस होत नसेल तर आमच्या सोबत येऊन बोला.तरीही धाडस होत नसेल तर किमान आमच्या सोबत उभे राहा.जर सोबत उभे राहाण्याचेही धाडस होत नसेल तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाहीत.

बुद्धी,विद्या,उद्यम,बलम,साहस,यत्न:!
यत्र यत्र वर्तते,तत्र देवोपि साह्य कृत:!!
जलगांवस्य अभिउत्थानाय,
किमपि वयम,जागृत जनमंच:?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव