काँग्रेसने हट्ट धरलाय नसता तर देशात 2 महिनेअगोदर प्रजासत्ताक दिन साजरा झाला असता? – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

39

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि. 22जानेवारी):-26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिन आपल्या देशात मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत येत असतो. मुळातच प्रजासत्ताक दिन म्हणजे जिथे लोकांची सत्ता असते किंवा शासन व्यवस्थेतील सर्वोच्च सत्ता लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी मध्ये केंद्रित झालेले असते.

अशी शासन व्यवस्था किंवा लोकशाही किंवा गणराज्य आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभा स्थापन करण्यात आली होती.

त्या संविधान सभेने आपल्या देशाचे हक्काचे भारतीय संविधान लिहिण्यासाठी 26 ऑगस्ट 1947 ला मसुदा समिती स्थापन केली होती. तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशहितासाठी व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता रक्ताचा पाणी आणि हाडाचे पीठ करून 2 वर्षे 11 महिने 17 दिवसात 1) प्रस्तावना, 2) 22 भाग, 3) 395 कलमे, 4) 8 परिशिष्ट असलेले भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला अर्पण करून भारतीय संविधान भाग 22 आर्टिकल 393 नुसार आपल्या संविधानाचे संविधानिक नाव “भारताचे संविधान” असे ठेवले आहे.

26 नोव्हेंबर1949 ला अर्थात दोन महिन्यापूर्वीच भारतीय संविधान देशाला अर्पण केल्यानंतर ते संविधान 2 महिने उशिरा का लागू केले होते‌. त्याचे सर्वात मोठे कारण असे आहे की तेव्हा देशात काँग्रेसचे वर्चस्व होते.आणि काँग्रेसचे म्हणणे होते की, देशात भारतीय संविधान लागू करण्यासाठी एखाद्या ऐतिहासिक दिवस (Date) असावा म्हणून 26 तारीख पुढे आली.

26 तारखेचे ऐतिहासिक महत्त्व असे की डिसेंबर 1929 च्या लाहोर येथील काँग्रेसच्या अधिवेशनातील ठरावानुसार 26 जानेवारी 1930 हा भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. म्हणून 26 तारखेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता 26 जानेवारी 1950 हा भारतीय संविधानाचा प्रारंभ दिन अर्थात प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखण्यात येतो व प्रजासत्ताक दिन म्हणुण देशभर साजरा करण्यात येतो‌.अशी महत्त्व पूर्ण माहिती दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना मो.8766744644 यांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधी सिध्दार्थ दिवेकर यांनी यवतमाळ येथे प्रत्यक्ष भेटून दिली.
व तसेच प्रजासत्ताक दिनाच्या देशातील तमाम भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा….! दिल्यात.