वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये राष्ट्रीय मतदार  दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

33

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.26जानेवारी):-श्री शिवाजी शिक्षण संस्था विद्यानगर कराडचे उच्च शिक्षण मंडळ विद्यानगर, कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये तहसील कार्यालय, कराड व महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

वरिष्ठ विभागातील निवडणूक साक्षरता मंडळामार्फत प्रा. आर. पी. पवार, प्रा. श्रीमती एस. पी. पाटील, प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भारतीय लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रिया, मतदारांचे हक्क व जबाबदारी, नवमतदार नोंदणी या विषयावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा व भित्तिपत्रक स्पर्धांचे आयोजन केले.

कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत प्रा. के. एस. महाले, प्रा. श्रीमती पी.एस. सादिगले, प्रा. यु.ए. मस्कर, यांनी रांगोळी  व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांना तहसील कार्यालय, कराड यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात आले.

सदर प्रमाणपत्रांचे वितरण मा. प्राचार्य डॉ.एल. जी. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे, उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमात स्वागत,  प्रास्ताविक व मतदार प्रतिज्ञाचे वाचन प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी केले तर आभार प्रा. श्रीमती एस पी पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक प्राध्यापिका व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.