महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा….

113

✒️पी.डी. पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगांव(दि. २६जानेवारी):-गुरूवार रोजी स्थानिय महात्मा फुले हायस्कूल मध्ये मोठ्या उत्साहात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील वर्ग ९ वी च्या वर्गात प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.सोनाली रविंद्र पाटील हिच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर धरणगाव शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली.

शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. स्वातंत्र्य – समता – न्याय – बंधुता या मूल्यांवर आपला देश मार्गक्रमण करीत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत. सर्वांनी संविधानाचा आदर राखला पाहिजे व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वर्ग आठवीतील विद्यार्थिनी कोमल भोई हिने देशभक्तीपर गीत सादर केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासो. ज्ञानेश्वर महाजन, संचालक सुकदेव महाजन, सुभाष महाजन, गोपाल महाजन, मोतीलाल महाजन व सर्व सन्मानणीय संचालक मंडळ, शाळेचे माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यु पाटील, एम के महाजन, जे ए अहिरे, मुख्याध्यापक जे एस पवार, नुतन प्राथमिक विद्यामंदीरचे मुख्याध्यापक अतुल सुर्यवंशी, पर्यवेक्षक एम बी मोरे, पुण्यनगरी चे पत्रकार धर्मराज मोरे, माजी क्रीडाशिक्षक व्ही पी महाले, वाय डी महाजन, पालक बस्तीलाल पाटील, लालसिंग पाटील, संत सावता माळी युवक संघाचे विनायक महाजन, जेष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, एस व्ही आढावे, सी एम भोळे, एच डी माळी, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, प्राथमिक विभागाचे तुषार पाटील, अजय पवार, ग्रंथपाल गोपाल महाजन, सेवक अशोक पाटील, जीवन भोई तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.