डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच देशाचे संविधान लिहिले नाही या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध-दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

102

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ (दि. 27 जानेवारी):- काल 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त tv9 या न्यूज चॅनलला मुलाखत देताना सुप्रियाताई सुळे या म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक महिला व पुरुष यांनी जगातील सर्वात चांगले संविधान देशाला दिले …!

मुळातच सुप्रियाताईच स्टेटमेंट म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल गैरसमज निर्माण करणारे असल्यामुळे सुप्रियाताईचा भिम टायगर सेनेचा वतीने मी दादासाहेब शेळके जाहीर निषेध करतो.

व मला सुप्रिया ताईंना विचारायचं की, डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर अनेक पुरुष व महिला यांनी देशाला संविधान दिले ते महिला आणि पुरुष कोण त्यांचे नाव काय..? आहेत हे जनतेला सांगावे.

मुळातच काही लोकांनी या देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी सविधाना बद्दल गैरसमज निर्माण करण्याची सुपारी घेतली घेतल्याचे पूढील उदाहरणा वरुन सिध्द होते.

1) ज्येष्ठ पत्रकार व अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्कालीन सरकार मधील मंत्री अरुण शौरी यांनी “वर्शिपिंग फॉल्स गॉड” हे पुस्तक लिहिले त्यात ते लिहितात डॉ.आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार नाहीत.
2) 24 ऑक्टोंबर 2018 नांदेड मधील कंधार चे व शे.का. पक्षाचे मा.खासदार केशवे धोंडगे म्हणाले डॉ.आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नाहीत
3) 3 जानेवारी 2020 ला टीव्ही चॅनलला मुलाखत घेताना शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणतात की फक्त डॉ. आंबेडकरांनी संविधान लिहिले नाही.याच बरोबर आंबेडकर संविधानाचे शिल्पकार नाहीत म्हणणारे अनेक नमुने अर्थात महाभाग देशात आहेत.आता त्याच रांगेत खा.सुप्रिया सुळे जाऊन बसल्या असून त्यांचे पुरोगामीत्व बेगडी आहे का ? कळायला मार्ग नाही‌.मला सुप्रियाताई सुळेंच्या ज्ञानात भर घालायची आहे.संविधान लिहीत असताना ज्या घडामोडी घडल्या त्यावर एक पुस्तक लिहिले असून ते पुस्तक लोकसभेत आजही उपलब्ध आहे. त्या पुस्तकाचे नाव “घटना परिषदेत वाद- विवाद”असे आहे ते पुस्तक अनेक खंडात विभागले असून त्या पुस्तकातील खंड क्र.7 पान नं. 231 वर पुढील प्रमाणे मजकूर आहे. दि.5 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत संविधान सभेचे सदस्य टि.टि.कृष्णमचारी यांचे भाषण झाले होते.त्यात ते म्हणतात संविधान सभेने प्रत्यक्षात संविधान लिहिण्यासाठी 26 ऑगस्ट 1947 ला 7 सदस्यीय मसुदा समिती तयार केली होती.तिचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते.तर इतर सदस्य पुढील प्रमाणे
1)अल्लादी कृष्णमचारी 2) बी.एल.मितर
3) डी.पी. खैतान 4 ) के.एम.मुन्सी
5) सय्यद अहमद साद्दुला 6) एन.गोपालस्वामी अय्यंगार
असून त्यापैकी मसुदा समितीचे सदस्य 1) अमेरिकेला गेला
2 ) एकाचे निधन झाले 3) 2 सदस्य दिल्लीपासून खूपच दूर होते 4) एक राजकारणात व्यस्त होता. 5) एक उद्योगात व्यस्त होता.त्यामुळे संविधान लिहिण्याची सर्व जबाबदारी शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर येउन पडली होती. संविधान लिहीत असताना आंबेडकरांना अनेक बिमारीने घेरले होते.

त्यावेळी अनेक डॉक्टर बाबासाहेबांना मावळती ज्योत असे म्हणत होते. पण देश हितासाठी व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता हाडाचे पीठ,रक्ताचे पाणी व रात्रीचा दिवस करून दोन वर्षे 11 महिने 17 दिवसात 1) प्रास्ताविक 2) भाग 3) 395 कलमे 8)परिशिष्ट असलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केले होते.

त्यामुळे भारतीय संविधानाचे शिल्पकार फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.असे हिंदू धर्माचे व संविधान सभेचे सदस्य असलेले टि.टि‌ कृष्णमचारी यांनी संविधान सभेतील 289 सदस्या समोर म्हटले होते.देशाचा संविधान लिहिण्याचा इतिहास असा असताना सुप्रियाताई सुळे यांनी उगीच देशातील नागरिकांमध्ये गैरसमज पसरून अप्रत्यक्ष पणे मनुवादी व आरएसएस भाजपचे काम करू नये अन्यथा भिम टायगर सेना तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अशी महत्त्व पूर्ण माहिती दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना यांनी आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सिध्दार्थ दिवेकर यांना प्रत्यक्ष भेट देऊन दिली आहे.