देवपिंपरी येथे गळफास लावलेले अवस्थेत सापडला मृतदेह; नातेवाईकांनी केली घातपाताची तक्रार

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.28जानेवारी):- तालुक्यातील देवपिंपरी येथे एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना आज (दि,२८ जानेवारी) रोजी घडली आहे सदरील प्रकार हा आत्महत्याचा नसून घातपाताचा असल्याचा आरोप मयत शेतकऱ्याच्या मुलासह नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात तक्रार घेऊन कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह झाडावरून खाली उतरवणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

गेवराई तालुक्यातील देवपिंपरी येथील बंडू सखाराम सुरनर (वय ५०) असे मयताचे नाव आहे. बंडू सखाराम सुरनर यांचा मृतदेह (दि,२८ जानेवारी) रोजी शेतातील एका लिंबाच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. घातपाताचा आरोप करत नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

या प्रकरणात आमची तक्रार घेऊन तात्काळ कारवाई करा अशी मागणी करत नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरविण्यास नकार दिला होता. घटनास्थळी गेवराई पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी बंडू सुरनर यांचा मुलगा भैयासाहेब सुरनर यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, रस्त्याच्या जाण्या- येण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी माझ्या वडिलांना लिंबाच्या झाडाला फाशी देऊन मारले असून त्यांच्याविरुद्ध तक्रार असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाली नव्हती

Breaking News, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED