मक्ता वासीयांनी केला प्रजासत्ताक दिनी शिक्षकाचा सत्कार

31

🔹हा सत्कार माझ्यासाठी अनमोल-मु. अ. छाया गोंडे

✒️गोंडपीपरी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

गोंडपीपरी(दि.29जानेवारीजि प प्राथमिक शाळा मक्ता प स गोंडपीपरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त बाळ गोपाळाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जी प सदस्य अमर सावकार बोडलावर यांनी केले तर अध्यक्ष म्हणून भंगाराम तळोधीच्या सरपंच्या बालुरवार होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक कापकर, उपसरपंच धापर्डे, तसेच सर्व ग्रामपंचायत भ तळोधीची सर्व टीम उपस्थित होते. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ पोटे, उपाध्यक्ष सुष्माताई कुबडे व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच भगारपेठ शाळेचे मुख्याध्यापक रवी कुडमेथे, निलेश मडावी, सुपगाव शाळेचे पंकज मडावी, विट्ठलवाडा शाळेचे मुख्याध्यापक नोमाजी झाडे, गौतम उराडे, विठ्ठल गोंडे उपस्थित होते.

निमंत्रित पाहुण्याच्या हस्ते क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनिय भाषणात माजी जी प सदस्य अमर सावकार बोडलावर यांनी शाळे मध्ये असलेल्या समस्याचे निवारण लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले. येत्या दोन महिन्यांत नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर करू असे सांगितले.

सदर कार्यक्रमा प्रसंगी शाळेच्या आदरशील व उपक्रमशील मुख्याध्यापिका सौ छाया विठ्ठल गोंडे यांचा गाववासीयकडून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच शाळेचे स.शि.गजानन बोढे सत्कार करण्यात आला. उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर बाळ गोपाळाचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.16 पटसंख्या असलेल्या शाळेंनी जवडपास 32 डान्स सादर केले. यामध्ये कोळीगीत, देशभक्ती गीत, लावणी, शेतकरी गीत, हागणदारीमुक्त नक्कल असे विविध प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे कौतुक केले. या कार्यक्रमात गावकऱ्यांनी शाळेसाठी 25000 हजार रुपयाचे योगदान दिले.

या कार्यक्रमाचे आयोजन , नियोजन व प्रास्ताविक मुख्याध्यापक छाया गोंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व पाहुण्यांचे या आभार गजानन बोढे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी, पालक वर्ग व गावातील युवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.