माजी सैनिक संघटना गंगाखेड यांच्या वतीने परमेश्वर जवादे यांचा सत्कार

38

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31जानेवारी):-तालुक्याचे सुपुत्र तालुका समादेशक परमेश्वर जवादे यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले असल्याने त्या निमित्ताने दि 29 जानेवारी रोजी आजी व माजी सैनिक संघटना गंगाखेड यांच्यावतीने गंगाखेड सैनिक कार्यालय येथे परमेश्वर केरबा जवादे यांचा सत्कार समारंभ पार पडला.

आजी व माजी सैनिक संघटना अध्यक्ष अशोक आयनिले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तालुका समादेशक परमेश्वर जवादे यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले.लवकरच दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जवादे यांची निवड राष्ट्रपती पदकासाठी झाल्याबद्दल आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.तसेच औरंगाबाद विभागात महसूल विभागाच्या मार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

त्या स्पर्धेमध्ये गंगाखेडचे माजी सैनिक अंतराम मुंडे यांनी सहभाग नोंदवून परभणी जिल्ह्याला मानाचे स्थान मिळून दिले. त्याबद्दल त्यांचा आजी-माजी सैनिक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच अशा व्यक्तींचा सत्कार माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. त्यामध्ये डोंगर जवळा मधून सरपंच प्रभाकर घरजाळे,आवलगावचे उपसरपंच लालदास पवार यांचा सत्कार करण्यात आला.आपदा परिस्थितीवर मात करण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील पंधरा दिवसाचे आपदा ट्रेनिंग पूर्ण करून आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार माजी सैनिक संघटना यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी आपले मनोगत सुभेदार विश्वनाथ सातपुते, सुभेदार काशिनाथ पोळ, तालुका समादेशक परमेश्वर जवादे, उपसरपंच लालबा पवार, अंतराम मुंडे, मंगेश आंधळे त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार अर्जुन जाधव. यांनी केले तर आभार अशोक आयनिले यांनी मानले. यावेळी सुभेदार गोपाळ भालेराव, आनंद डी शिंदे, मारुती लटपटे, जनार्दन मुंडे, महारुद्र मुंडे,अंकुश मुंडे, दिगंबर तांदळे, प्रभाकर घरजाळे, पंडितराव सोनवणे, गंगाधर फड, पंढरीनाथ तांदळे, महादेव फड, माधव फड, पाठलोबा मुंडे, माणिक बडवणे, नागनाथ आंधळे,भगवान ससाने, किशन भोसले, बालाजी जवादे आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.