धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी कुणबी पाटील समाज आक्रमक…

32

🔹तुकोबांचा अपमान म्हणजे आमच्या बापाचा अपमान — भिमराज पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.31जानेवारी):- येथील समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष, पंच मंडळ व समाज बांधवांनी जगद्गुरू तुकोबारायांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करण्याऱ्या धीरेंद्र शास्त्री च्या अटकेसाठी आक्रमक पवित्रा घेत पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयात निवेदन सादर केले.

बागेश्वर धाम येथील मनुवादी विकृत मानसिकता असलेल्या धीरेंद्र शास्त्री ने नुकतंच जगद्गुरू तुकोबाराय यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हा विकृत प्रवृत्ती असलेला व्यक्ती म्हणतो की, ‘महाराष्ट्र के एक संत हैं संत तुकाराम करके उनकी बिवी उन्हे रोज पिटती थी ईसलीये वह ईश्वर की भक्ती करने लगे।’. ज्याला तुकोबाराय काय आहेत यांची इतंबूत माहिती नाही, ज्या व्यक्ती चे वय २५ किंवा २६ वर्ष असेल, जो भोंदूगिरी करून पोटाची खळगी भरत असेल त्याने तुकोबांच्या बाबतीत असं बोलणं म्हणजे कुठेतरी संस्कारांचा अभाव आहे, असं जाणवतं. जगद्गुरू तुकोबाराय आमचा मान – आमचा स्वाभिमान असून त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. धीरेंद्र शास्त्री ला मिळालेले संस्कार चुकीचे असतील म्हणून तो आमच्या बापाबद्दल गरळ ओकतोय. या विकृत किड्याला अटक करून त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी तसेच त्याला कठोर शासन व्हावे अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सर्व समाज बांधवांनी दिला.

यासंदर्भात धरणगाव चे स.पो.नि. जिभाऊ पाटील आणि नायब तहसिलदार लक्ष्मणराव सातपुते यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी समस्त कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ संचालक माधवराव बाबुराव पाटील, चुडामण पाटील, दत्तू पाटील, संचालक राजेंद्र पाटील (महाले), कैलास पाटील, मोहन पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, दिनेश पाटील, अशोक पाटील, आनंदराज पाटील, वाल्मिक पाटील, परशुराम पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह गुलाब पाटील, मुरलीधर पाटील, माधवराव आधार पाटील, किशोर पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, समाधान अरुण पाटील, समाधान रविंद्र पाटील, समाधान मुरलीधर पाटील, समाधान शांताराम पाटील, गोकुळ पाटील, राजेंद्र पाटील, मनिष पाटील, सुरेश गुरव, गोपाल पाटील, सुखदेव महाजन, ओंकार महाजन, स्वप्निल चौधरी, रुपेश जाधव, दिनेश भदाणे, विक्रम पाटील आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.