संत रविदास महाराज जयंती हर्षोल्लासात साजरी

33

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.7फेब्रुवारी):-समरसता मंच चंद्रपुर, व संत रविदास महाराज मंडळ यांनी दि.५-२-२०२३ ला माघ पूर्णिमेला ला संतशिरोमणी गुरू रविदास जी महाराजांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात पार पडली. समरसता मंचाचे जिल्हा संयोजक डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सुदर्शन नैताम, सामाजिक कार्यकर्ते गणेश पेलने, कुंदा काकडे, प्रकाश लिपटे, सचिन बरबटकर, सुभाष नरुले, गंगाधर गुरूनुले, स्वाती बावणे, सुनीता लिपटे, मंदा डाखरे, वनिता नवले, कैलास बाचाशंकर, सुरेश खानझोडे, आदी उपस्थित होते.

संतशिरोमणी गुरु रविदासांची महती सांगताना संत गुरू रविदासजी हे जातीवाद व अंधविश्वास यांच्या विरोधात होते, त्यांनी समाजाच्या उद्धाराकरिता अनमोल विचार मांडले अनेक दोहे, भजनांची रचना केली त्यातून समाजात समरसता कशी वाढेल यावर भर दिला. त्यांनी सांगितले की निर्मल व शुद्ध मनातच परमेश्वर वास करतो. त्यांची अमृतवाणी समाजाला भुरळ घालणारी होती. “मन चंगा तो कटोरी मे गंगा.” ” मै चाहू ऐसा राज मिले सबको अन्न, छोट बडे सब सम बसे, रविदास रहे प्रसन्न.

” ” मन ही पूजा मन ही धूप, मन ही सेहू- सहज स्वरूप” असे समाजाला प्रोत्साहित करणारे दोहे रचून समाजाची निस्वार्थ सेवा केली. त्यांनी केलेली सेवा व त्यांचे कार्य समाजातील शेवटच्या सभासदापर्यंत पोहोचविण्याचे कार्य रविदासजींचे सेवक बनवून आपल्याला करायचे आहे. असे समर्पक मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.यात मुकुंदा बावणे,प्रशांत नवले, प्रभाकर खंडाळे गजानन नवले, लपिष लिपटे, रितेश खंडाळे, संतोष बावणे, प्रणय चव्हाण, विजय बावणे, शंकर खांझोडे, चंदू चव्हाण, महादेव बावणे, अक्षय धुळे, विजय खंडाळे, चंद्रशेखर खांजोडे, अरुण भटवलकर, कामेश दुबे, यशवंत धुळे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.