महाराष्ट्र राज्य ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या उपाध्यक्षपदी संतोष धायबर

32

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि 7फेब्रुवारी):- देशात तेवीस राज्यांमध्ये १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या डिजिटल मीडिया विभागाची, पत्रकारांची राज्य कार्यकारिणी सोमवार, दि.६ फेब्रुवारी रोजी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केली. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या डिजिटल मीडिया’ विभाग उपाध्यक्षपदी पत्रकार संतोष धायबर यांची निवड करण्यात आली आहे. संतोष धायबर गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहेत. दै. ‘सकाळ’ मध्ये ते २२ वर्षे कार्यरत होते. वरिष्ठ उपसंपादक म्हणून त्यांनी ई-सकाळचे काम पाहिले आहे. सध्या ते पोलिसकाका, महाभारत न्यूज आणि शिरूर तालुका या संकेतस्थळाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहात आहेत. श्री. धायबर यांनी विविध विषयांवर सातत्याने लिखान केले असून, त्यांची तीन पुस्तके प्रकाशीत झाली आहेत, त्यांचे अनेक लेख, बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. विविध विषयांवर ब्लॉग लिहीले आहेत. शिवाय, स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन वार्तांकन केले आहे.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. गायकवाड आता ‘ई-चावडी’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. ‘डिजिटल मीडिया’च्या राज्य टीममध्ये ‘डिजिटल मीडियात’ काम करणाऱ्या दिग्गज पत्रकारांना घेण्यात आले आहे. ज्या मध्ये कार्याध्यक्ष योगेश कुटे संपादक लेट्सअप, मनोज साखरे दिव्य मराठी, उपाध्यक्ष संतोष धायबर संपादक – पोलिसकाका महाभारत, उपाध्यक्ष महेश गलांडे लोकमत, अशोक गव्हाणे सकाळ, सरचिटणीस के. अभिजित एनजीओ खबर, नीलिमा राऊत डिजिटल जर्नलिस्ट, सहसरचिटणीस प्रवीण खुंटे एएसपी मीडिया, मीनल गांगुर्डे न्यूज १८ लोकमत, प्रवक्ता प्रथमेश पाटील इंडी जर्नल, संघटक अरुंधती गडाळे कुॲप, कार्यवाहक भागवत पेटकर डेलीहंट, तुषार भामरे जळगाव लाईव्ह, संघटक योगेश गायकवाड सलाम पुणे, अमित उजागरे ई-सकाळ, अक्षय कांबेकर पब्लिक वाईब न्यूज ॲप, प्रसिद्धी प्रमुख किशोर ससाणे ललकारी, सदस्य अभिजित कांबळे संपादक महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, सोनल महाडिक लोकमत, तेजस शेलार अहमदनगर लाईव्ह, अविनाश पथक संपादक पंचनामा, महेश घोलप टीव्ही ९, सूरज पाटील मुंबई तक, मनीष भंडारी वेटून्यूज, गौतम संचेती दर्पण लाईव्ह यांची निवड करण्यात आली आहे.

सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना राजा माने म्हणाले, ‘काळाप्रमाणे पत्रकारिता बदलली आहे, डिजिटल मीडियाच्या बाबतीत होत चाललेला बदल सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्यभरात पुढाकार घेईल.’

संदीप काळे म्हणाले, अजूनही ‘डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. ‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी आमची लढाई असेल. यासाठी पॉलिसी बनवून ती पॉलिसी राज्य, केंद्राकडून अमलात आणली जाणार आहे.’व्हॉइस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून ऑनलाईन क्षेत्रात काम करत असलेल्या पत्रकारांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भविष्यात काम करणार आहे, असे उपाध्यक्ष संतोष धायबर शेवटी बोलताना म्हणाले.