ट्रॅक्‍टर चोरी प्रकरणी तिघांना अटक; ३ दिवसांची पोलिस कोठडी

29

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

केज(दि.12फेब्रुवारी):-तालुक्यातील कोरेगाव येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी केज पोलिसांनी कळंब पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींना आपल्‍या ताब्यात घेतले. या टोळीने अवघ्या दोन महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून चार ट्रॅक्टर चोरले असल्याचे चौकशीत उघड झाले आहे. कोरेगाव ता. केज येथील अजमेर रसूल तांबोळी यांनी दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. (एम एच-२४/ डी-४८६५) हा कोरेगाव येथील केज-बीड रस्त्यालगतच्या भाई-भाई वेल्डिंग वर्कशॉप समोर उभा केला होता.

दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ६:०० वाजकेज तालुक्यातील कोरेगाव येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणी केज पोलिसांनी कळंब पोलिसांच्या ताब्यातील तीन आरोपींना आपल्‍या ताब्यात घेतलेण्याच्या दरम्यान हा ट्रॅक्‍टर चोरीला गेला होता. दि. ९ जानेवारी रोजी अजमेर तांबोळी यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस नाईक दिलीप गित्ते हे करीत होते.

दरम्यान अशाच गुन्ह्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर चोरीच्या प्रकरणात विकास बापूराव भालेकर, (रा. तांदळवाडी जि. उस्मानाबाद), मुस्तफा नासेर सय्यद, (रा. कळंब जि. उस्मानाबाद) आणि मोबीन मोहसीन सय्यद (रा. नेकनूर जि. बीड) यांना पकडून कळंब पोलीसांच्या ताब्यात दिलेले होते. ही माहिती मिळताच केज पोलिसांनी या ट्रॅक्टर चोरांची तेथील पोलीस कोठडी संपताच पोलीस नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक देवकते आणि पोलीस नाईक महादेव बहिरवाळ यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात या ट्रॅक्टर चोरांच्या टोळीने लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातून चार ट्रॅक्टर चोरून ते भंगारात विकुन नष्ट केल्याचे उघड झाले आहे.

या ट्रॅक्टर चोरांनी आणखी कुठे ट्रॅक्टरची चोरी केली. त्याची विल्हेवाट कशी लावली. हे उघड होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने त्यांना १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या ट्रॅक्टर चोर टोळीने चोरलेले ट्रॅक्टर :-

१) लातूर जिल्ह्यातील एकूरगा येथील शंकर श्रीरंग गाडे यांचे दि १५/११/२०२२ रोजी न्यु हॉलंड (एम एच-२५/ ए एस-२०१९) हा ट्रॅक्टर चोरला. त्याचा मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास हवालदार रामराव चव्हाण हे करीत आहेत.

२)उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील अक्षय शंकर जावळे यांचे दि. ११/१२/२०२२ रोजी सोनालिका छत्रपती ट्रॅक्टर (एम एच-२५/ ए एच-१९६९) चोरीला गेला. त्याचा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास अज्जू नासेर शेख हे करीत आहेत.

३)उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील अण्णासाहेब भास्कर कोल्हे यांचे सोनालिका एम एच २५/ए एस-७२६० हा ट्रॅक्टर दि. ५/१/२०२३ रोजी चोरीला गेला. त्याचा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास गणेश वाघमिडे हे करीत आहेत.

४) बीड जिल्ह्यातील कोरेगाव ता केज येथील अजमेर रसूल तांबोळी यांचे दि.दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र. (एम एच-२४/ डी-४८६५) हा चोरीला गेला. त्याचा केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास दिलीप गित्ते हे करीत आहेत.