खोट्या दस्तऐवजावर बळकावले पोम्भूर्णा बाजार समितीचे प्रशासकीय पद

  42

  ?रुपेश निमसरकार यांचा पत्रकार परिषदेत आरोप

  ✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर (दि. १६जुलै) :-पोम्भूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर पद करण्या-यानी खोटे दस्तऐवज सादर करून शासन व प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप रुपेश निमसरकार यांनी पत्रकार परिषदेत केला.

  पोम्भूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळावर पद करण्या-यानी खोटे दस्तऐवज दिल्याची माहिती मिळाल्या नंतर माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत माहिती मागितल्यानंतर बरेच घबाड उघड झाले आहे. चक घोसरी येथील दामोधर येल्ला चिमलवार यांच्या सर्वे नंबर १२३/१ या जमिनीच्या सातबारावर खोडतोड करून चक घोसरीच्या ऐवजी पोम्भूर्णा केले व दामोधर चिमलवार यांच्यासोबत लीलाताई विलास कावटवार व आशिष विलास कावटवार असे खोटे नाव संगणकाद्वारे केले. तो खोटा सातबारा खरा असल्याचे शपथपत्र दिनाक ४ फेब्रुवारी २०२० रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे समक्ष केले. या बनावट कागदपत्राच्या आधारे प्रशासक पद ग्रहण केले. ही कृषी उत्पन्न बाजार समिती सोबत धोखाधडी असल्याचे रुपेश निमसरकार यांनी सांगितले.

  अतिक अहमद कुरेशी हे जनता विद्यालय पोम्भूर्णा येथे शिक्षक म्हणून नौकरी करीत आहे. सोबतच ते नगर पंचायत पोम्भूर्णा येथे नगर सेवक आहेत. नगर सेवक पद मिळविताना फक्त शेती करतो असे खोटे शपथपत्र सादर केले. येथून शासनासोबत धोखाधडी करून पद बळकावले आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रुपेश निमसरकार यांनी केली.