उमरखेड तालुक्यातील दिघडी शाळेतील शिवशंकर कदम ठरला बॅडमिंटन चा जिल्हाविर

30

[समस्त गावकरी दिघडी तर्फे सत्कार समारंभ]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 13 फेब्रुवारी):- जिल्हा परिषद उच्च प्राथामिक शाळा दिघडी येथील शाळेचे माजी विद्यार्थी तथा महागाव येथे तहसिलदार या पदावर कार्यरत असलेले श्री. विश्वाम्भरराव राणे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

यवतमाळ येथे झालेल्या जिल्हा स्तरीयक्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन खेळामध्ये जि. प. शाळा दिघडी चा विदयार्थी शिवशंकर विनायक कदम याने सर्व प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत प्रथम क्रमांक पटकावला व आपल्या गावाचे, उमरखेड तालुक्याचे नाव रोशन केले.

ग्रामीण भागात राहुन कोणत्याही सोई सुविधा नसताना त्याने हे यश संपादन केले.मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून दिले. त्यामुळे दिघडी वासियातर्फे शिवशंकर विनायकराव कदम याचा त्याच्या आईवडीलासमवेत सत्कार करण्यात आला.

तसेच दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी NMMS परीक्षेचा निकाल लागला त्यामध्ये जि. प.उच्च.प्राथ. शाळा दिघडी शाळेचे विद्यार्थी

1)कु समृध्दी गोपाल राणे -112 गुण 2) राजनंदिनी पंजाबराव राणे 84 गुण 3)कान्होपात्रा साहेबराव राणे 78 गुण 4)शिवशंकर विनायक कदम 70 गुण मागील वर्षी पेक्षाही जास्त गुणाने या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.त्यांना मार्गदर्शन करणारे बोळकुंटवार सर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.यावेळी गावचे सरपंच श्री.सुनिल कवडे,उपसरपंच श्री.दिपकराव राणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.पंजाबराव राणे, उपाध्यक्ष पुंजाराम शिंदे, शालेय सदस्य शिक्षण तज्ज्ञ डॉ. आयूब साहेब, माजी शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष श्री.सतीश राणे, पोलीस पाटील सुधाकर देवराये, तलाठी, डॉ.आनंद राणे, शिवाजीराव ग.राणे, भगवानराव राणे, युवराज मिराशे, विविध कार्यकारी सोसायटी चे माजी संचालक आनंदराव राणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेश राणे, श्री. नागोराव राणे (शिवशंकरचे मामा), युवराज मिराशे डॉ. आनंदराव राणे, दत्ता गायकवाड, रवि गच्चे, अविनाश राणे, गजानन, मारोतराव राणे, सोळंके, पवार, नागेश राणे, सदानंद राणे, शाळेचे माजी विद्यार्थी तथा महात्मा फुले माध्यमिक शाळा उमरखेड येथे शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. किशोर राणे सर व जि.प.धनज येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री.सुधाकर कवडे सर हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते.

या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी दिघडी यांनी केले होते. तर सूत्रसंचालन श्री.कल्याणकर सर यांनी केले तर प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेख सर यांनी केले.

यावेळी शाळेतील शिक्षकवृंद श्री.डोईफोडे सर,फड मॅडम, श्री.देवसरकर सर,कर्नेवाड सर,बोलकुंटवा सर,गायकवाड सर सर्व शिक्षकांनी कार्यक्रम चांगला अप्रतिम करण्यासाठी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. देवसरकर सर यांनी केले.

आभार प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांना या शुभ प्रसंगी स्वीट पदार्थासह मसालेभात गावचे भूषण तथा शाळेचे माजी विद्यार्थी मा. विश्वाभराव राणे साहेब तहसिलदार यांच्या वतीने देण्यात आला.