विद्रोहाची “गोधडी” भारत देशाला वर्णव्यवस्थेतून मुक्त करणार !

90

✒️औरंगाबाद(पुरोगामी न्युज नेटवर्क)

औरंगाबाद(दि.14फेब्रुवारी):-अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन आयोजित रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “गोधडी” नाटक तापडिया नाट्य मंदिर, औरंगाबाद येथे प्रस्तुत झाले. नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ! ११ व्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचा मिलिंद शिंदे यांच्या हस्ते सम्मान झाला.

संस्कार आणि संस्कृतीच्या नावाखाली आज समाजाला हिंसक, क्रूर आणि धर्मांध बनवले जाते आहे.आपली संस्कृती काय आहे? आपण कधी विचार करतो का ? द्वेष, युद्ध, हिंसा आणि वधाच्या विकाराला पुजणे ही आपली संस्कृती आहे का?

संस्कृती, अस्मिता आणि धर्माचे रक्षक असल्याचा दांभिकपणा मिरवणाऱ्यांचे मूळ आहे हिंसा आणि त्या हिंसेचे मूळ आहे, वर्णव्यवस्था . वर्णव्यवस्था ही भारताची संस्कृती आहे जी शोषण, असमानता, अन्याय आणि हिंसेने चालते.

वर्णव्यवस्था इतकी विखारी आहे की ती पशुला माता म्हणून पूजते आणि माणसाला अस्पृश्य मानते. वर्णव्यवस्था वर्चस्वादातून न्यूनगंडाने ग्रासित अपसंस्कृतीला जन्माला घालते जी मानवतेच्या नावावर कलंक आहे.

गाव भारताचा आत्मा आहे. या भारताच्या आत्म्याला वर्णवादाची वाळवी लागली आहे. संपूर्ण गाव वर्णव्यवस्थेला पूजते. 73 वर्षात संविधान संमत भारताच्या स्वप्नाला साकार होऊ दिले नाही या वर्णवादाने.

संविधान संमत भारत बनवण्यासाठी भारतातील खेड्यापाड्यातून वर्णवादाचे उच्चाटन करणे अनिवार्य आहे. गोधडी हे नाटक वर्णवादी संस्कृती विरुद्धचा विद्रोह आहे. गोधडी हे नाटक भारतातील गावांना वर्णवादापासून मुक्त करण्याचा प्रण आहे.

नाटक गोधडी हे आपल्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. मनुष्याच्या विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा हे नाटक शोध घेते. मनुष्याच्या हिंसक विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेच्या संस्कृतीला उलगडण्याचा विचार”गोधडी” नाटकातून प्रत्येकाला मिळतो!

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, साक्षी खामकर, संध्या बाविस्कर,